शरद पवारांना पाडण्यासाठी पार्लमेंटरी बोर्डामध्ये ठराव, प्रफुल्ल पटेलांनी सांगितला तो किस्सा
मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासारखा पॉवरफुल नेता जर काँग्रेसचा अध्यक्ष झाला तर काँग्रेसमधील (Congress) काही लोकांना ते नको होते. म्हणून त्यांनी पवारांना बाजूला केले. या लोकांनी शरद पवार यांना पाडण्यासाठी पार्लमेंटरी बोर्डमध्ये ठराव घेतला होता, असा एक जुना किस्सा राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणून पटेल यांना ओळखले जाते. (ncp leader parful patel talk on sharad pawar and congress memory in 1990)
आज (21 जून) राष्ट्रवादीच्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना पटेल यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, एकनाथ खडसे, खासदार अमोल कोल्हे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.
शरद पवार यांना पाडण्यासाठी पार्लमेंटरी बोर्डमध्ये ठराव :
त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. परंतु काँग्रेस पक्षात त्यावेळी शरद पवार यांचे खूप वजन होते. पण असा पावरफुल नेता जर काँग्रेसचा अध्यक्ष झाला तर काँग्रेसमधील काही लोकांना ते नको होते. म्हणून त्यांनी पवारांना बाजूला केले. या लोकांनी शरद पवार यांना पाडण्यासाठी पार्लमेंटरी बोर्डमध्ये ठराव घेतला होता. त्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेस मधल्या दरबारी राजकारणी लोकांनी शरद पवार यांना कायम डावलले. म्हणून त्याचा परिणाम काँग्रेसला आज भोगावा लागत आहे. असा टोला वेळी प्रफुल्ल पटेलांनी काँग्रेस पक्षाला लगावला.
1999 मध्येच होती ‘महायुतीची’ ऑफर :
शरद पवार यांची एक सिद्धांतीक बाजू आहे, १९९९ मध्ये आपले ५८ आमदार निवडून आले होते. त्यावेळी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी शरद पवार यांना बोलावून भाजपसोबत युती करण्याची ऑफर दिली. एनडीएमध्ये एकत्र येऊन महाराष्ट्रात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करु, अशी ऑफर वाजपेयी यांनी पवारांना दिली होती.
मात्र तेव्हा शरद पवार यांनी ही ऑफर नाकारली. शरद पवार त्यावेळी म्हणाले, ही ऑफर जरी चांगली असली तरी आपण भाजपसोबत जायचं नाही. आपलं काँग्रेससोबत भांडण झाले असले तरी आपण दिल्ली सरकारमध्ये सामीलं व्हायचं नाही, असं पवार यांनी मनाशी पक्कं ठरवलं होतं, असे पटेल यांनी यावेळी बोलताना सांगितले.