आळंदीत ‘साहित्य निष्ठांची मांदियाळी’ या संतसाहित्य नांदी संमेलनाचे उद्घाटन संपन्न

Alandi Sant Sahitya Nandi Sammelan: आळंदीत 17 व्या संतसाहित्य नांदी संमेलनाचे उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते उद्घाट झाले.

Alandi Sant Sahitya Nandi Sammelan

Alandi Sant Sahitya Nandi Sammelan: आळंदी : “वारकरी संप्रदाय संतांच्या विचारांचा वारसा जपणारा ज्ञान समृद्ध संप्रदाय आहे. हा संप्रदाय समता, बंधुभाव आणि शिस्तीची जगातील सर्वांत मोठी परंपरा जपतो. त्यामुळे कीर्तनातून संत विचारांचे शुद्धपणे प्रबोधन होणे गरजेचे आहे.” असे विचार जेष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. उल्हासदादा पवार यांनी व्यक्त केले. विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी पुणे, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 100 व्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आळंदीतील 17 व्या नांदी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून यावेळी ते बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ गायिका उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी संमेलनाध्यक्ष व जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कालबाह्य अन्नपदार्थांची पुन्हा पॅकिंग करून विक्री, एफडीएचा महाराष्ट्रासाठी स्वतंत्र आदेश, 5 कोटींचा साठा जप्त

69 व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व माईर्स विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचा याप्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी मसापचे कोशाध्यक्ष प्रदीप निफाडकर, कार्यवाह सुनील महाजन, राजन लाखे, प्रभाकर ओव्हाळ, बबनराव कुऱ्हाडे, आळंदी नगर परिषदेच्या उपाध्यक्षा सुजाता तापकीर, नगरसेविका पूजा घुंडरे आणि माईर्स एमआयटी संस्थेच्या महासचिव प्रा. स्वाती कराड – चाटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. उल्हासदादा पवार यांनी वारकरी संप्रदाय हा समता, बंधुभाव आणि शिस्तीची परंपरा जपणारा ज्ञानसमृद्ध संप्रदाय असल्याचे सांगितले. भाषा ही संस्कृतीची खरी वाहक असून अभिजात लोकसंस्कृती टिकवण्यासाठी मराठी भाषा जोपासणे आवश्यक आहे. समाजात वितंडवाद घालण्याऐवजी संत साहित्यावर सुसंवाद आणि परिसंवाद घडायला हवेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

महायुतीतील वादावर एकनाथ शिंदेंनी दिला पूर्णविराम! म्हणाले, ‘मित्रपक्षावर चिखलफेक बंद करा’

डॉ. श्रीपाल सबनीस यांनी समाजाच्या नैतिक अधःपतनाबद्दल चिंता व्यक्त केली. संतत्वाची साथ सोडल्यामुळे समाजात दांभिकता आणि अंधश्रद्धा वाढत असल्याचे सांगत संतांच्या विचारांतून एकात्म महाराष्ट्र घडवण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रा. डॉ. विश्वनाथ कराड हे संत ज्ञानेश्वरांच्या ‘हे विश्वचि माझे घर’ या विचारांचे खरे पाईक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ज्येष्ठ गायिका उषाताई मंगेशकर यांनी संत ज्ञानेश्वरांच्या ‘भावार्थदीपिके’तील ओव्यांना हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीताचा साज चढवला आणि लतादीदींनी आपल्या स्वरातून त्या घराघरांत पोहोचवल्या, असे सांगितले. माउलींच्या पावन भूमीत डॉ. कराड यांनी निःस्वार्थ भावनेतून केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.

रामराजे निंबाळकर अन् जयकुमार गोरेंचं जुळलं; जुनं वैर विसरले की नवा राजकीय डाव?

प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी मराठी भाषेचे संवर्धन आणि पुढील पिढीला भाषेची ओळख करून देण्याची जबाबदारी शिक्षण संस्थांची असल्याचे सांगितले. चांगल्या साहित्यामुळे समाज समृद्ध होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संत साहित्याचे विचार रुजवणे गरजेचे आहे. नांदी संमेलनाच्या माध्यमातून ‘तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे’ होणारी वाटचाल मराठी भाषेला अधिक बळकटी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी जग अशांततेच्या उंबरठ्यावर असताना संतांच्या तत्त्वज्ञानाची गरज अधिक असल्याचे सांगितले. केवळ भौतिक विज्ञानातून मानवाला शांती, सुख आणि समाधान मिळू शकत नाही. विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय साधला, तरच जगात खरी शांतता प्रस्थापित होऊन मानवाचे कल्याण होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ठाकरे बंधू आणि फडणवीसांच्या भेटीने नवी राजकीय समीकरणं जुळणार? संजय शिरसाट म्हणाले…भाजप सत्तेत आली नसती!

याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर आणि कार्यवाह सुनील महाजन यांनी पुण्यात होणाऱ्या 100 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आळंदीतील साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. कार्यक्रमाला राजन लाखे, प्रभाकर ओव्हाळ, बबनराव कुऱ्हाडे, आळंदी नगर परिषदेच्या उपाध्यक्षा सुजाता तापकीर, नगरसेविका पूजा घुंडरे आणि माईर्स एमआयटीच्या महासचिव प्रा. स्वाती कराड-चाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉ. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. महेश थोरवे यांनी आभार मानले.

follow us