‘फडणवीस-महाजनांनी बदनामी केली म्हणून पक्ष सोडला’; नाथाभाऊंच्या तोंडी अपमानाच्या कटू आठवणी

Eknath Khadse : एकेकाळी भाजपातील ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप सोडून आता तीन वर्षांचा काळ उलटून गेला आहे. ज्या पक्षाला राज्यात मोठं गेलं. तळागाळात पोहोचवलं त्या पक्षावर टीका करायची किंवा पक्ष सोडून जायचं अशी मानसिकता कधीच नव्हती. पण, पक्षातील काही लोकांनी वारंवार अपमानित केलं. त्यामुळे नाईलाजानं पक्ष सोडावा लागला […]

Eknath Khadse

Eknath Khadse

Eknath Khadse : एकेकाळी भाजपातील ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप सोडून आता तीन वर्षांचा काळ उलटून गेला आहे. ज्या पक्षाला राज्यात मोठं गेलं. तळागाळात पोहोचवलं त्या पक्षावर टीका करायची किंवा पक्ष सोडून जायचं अशी मानसिकता कधीच नव्हती. पण, पक्षातील काही लोकांनी वारंवार अपमानित केलं. त्यामुळे नाईलाजानं पक्ष सोडावा लागला ही परिस्थिती खडसे यांच्याबाबत झाली होती. या टोकाच्या अपमानातूनच त्यांनी भाजपला कायमची सोडचिठ्ठी दिली. पक्षात कशा प्रकारे अपमानित केलं गेलं याचा खुलासाच एकनाथ खडसे यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि गिरीश महाजन यांचं नाव घेत त्यांच्यावर जोरदार टीकाही केली.

खडसे म्हणाले, मला भाजपाचा कधीही द्वेष नव्हता. मी कधी भाजपवर आरोपही केले नाहीत. मी ज्या पक्षाला वाढवलं त्यालाच नालायक म्हणायचं अशी माझी मानसिकता कधीच होणार नाही. पण, काही व्यक्तींबाबत माझा नक्कीच आक्षेप होता. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यासारख्यांन मला टार्गेट करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच मला भाजपमधून वेगळं व्हावं लागलं, अशी खंत खडसे यांनी बोलून दाखवली.

Devendra Fadanvis : आम्हाला शेजारच्या राज्यात बोलावतात, तुम्हाला शेजारच्या घरातही नाही; फडणवीसांचा ठाकरेंना टोला

बातमी अपडेट होत आहे.. 

Exit mobile version