अहमदनगर : दिवाळी फराळाच्या निमित्ताने यंदा नगर जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आपापल्या मतदारसंघात दिवाळी फराळाचे आयोजन केले आहे. हे नेते मंडळी आपल्या राजकीय समर्थक आणि विरोधकांनाही आमंत्रित करत आहेत. यातच सध्या आहे चर्चा आहे, ती म्हणजे भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांची. आमदार लंके यांनी राम शिंदे (Ram Shinde) यांच्या चौंडी येथील निवासस्थानी जात दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. राजकीय नेत्यांकडून टीका टिपणी सुरू असतानाच लंके आणि शिंदे यांच्या दिवाळी फराळाने राजकीय नेत्यांचे लक्ष वेधून घेतले.
World Cup : आफ्रिकेच्या फंलदाजांनी कांगारुंसमोर नांग्या टाकल्या! आता पावसाने सामना थांबविला
जिल्ह्यात सध्या नेते मंडळींकडून दिवाळी फराळाचे आयोजन केले जात आहे. हे नेते हे एकाच व्यासपीठावर येत एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत जुळवू लागले आहे. नुकतेच भाजपचे माजी मंत्री आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी त्यांच्या बुऱ्हानगर गावात आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमास राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुरज विखे, माजी आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप यांनी हजेरी लावली होती. या दिवाळी फराळानंतर जिल्ह्या चौंडी व पारनेर येथील दिवाळी फराळाची चर्चा ही रंगली होती.
गुरुवार रोजी एकाच दिवशी जामखेड तालुक्यातील चौंडी येथे भाजपचे आमदार राम शिंदे यांनी दिवाळी फराळाचे आयोजन केले आहे तर दुसरीकडे पारनेर मधील हंगा येथे आमदार लंकेंनी दिवाळी फराळाचे आयोजन केले आहे. त्यानंतर आमदार लंके यांनी चोंडी येथे जात आमदार शिंदेंना बालुशाही खाऊ घालत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. नवीन गेल्या काही दिवसांपासून व यांची जवळीक वाढू लागले असल्याने राजकीय वर्तुळात यांच्या चर्चा देखील रंगू लागले आहे.
रामाच्या दर्शनाचं अमिष का दाखवता? अयोध्यावारीच्या घोषणेवरुन राज ठाकरे कडाडले…
दरम्यान, माध्यमांशी बोलताना आमदार लंके म्हणाले की, आपण विरोधी पक्षात असतांनाही पालकमंत्री असलेल्या राम शिंदे यांनी मला जिल्हा परिषदच्या माध्यमातून विकास कामांना निधी देत खूप मदत केली. विरोधी पक्षात असतांनाही आमचा स्नेह कायम होता. आता तर आम्ही महायुतीचे घटक आहोत.
दिवाळी फराळावरून राजकारण
कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी दिवाळी फराळ च्या कार्यक्रमावरून राम शिंदे यांना शाब्दिक टोला लगावला आहे. फराळ कार्यक्रमाचे आयोजन करणे चुकीचे नाही मात्र त्याच बरोबर विकास कामे करणे देखील आहे. यावर राजकारण करणं महत्त्वाचे नाही अशा शब्दात रोहित पवार यांनी राम शिंदे यांना टोला लगावला आहे.
दरम्यान, आमदार शिंदे- आमदार लंके यांच्या या स्नेहामुळं जिल्ह्यात नवीन समीकरणं उदयाला येतं का, हेच पाहणं महत्वाचं आहे.