राम शिंदेंकडून पार्थ पवारांचा पाहुणचार! रोहित पवारांचा ‘चार’ शब्दांचा पुणेरी टोला
अहमदनगर : “नेत्यांच्या घरी जाऊन फराळ खाणं हे काही मोठ्या नेत्यांसाठी महत्वाचे असू शकते, पण विकासकामे देखील महत्वाची आहेत” असे म्हणत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे नेते पार्थ पवार आणि भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांना खोचक टोला लगावला. राम शिंदे यांच्या घरी आज (16 नोव्हेंबर) पार्थ पवार (Parth Pawar) फराळाचे उपस्थित राहणार आहेत. त्याचवेळी रोहित पवार चौंडीत विविध विकासकामांचे लोकार्पण करणार आहेत. या पार्श्वभूमवीर रोहित पवारांनी हे भाष्य केले.
जिल्हा कालवा सल्लागार समितीची समितीची बैठक आज अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीला आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. (NCP (Sharad Pawar) MLA Rohit Pawar attacked NCP (Ajit Pawar) leader Parth Pawar and BJP MLA Ram Shinde)
सख्खा-चुलत भाऊ पक्क्या विरोधकासोबत! रोहित पवारांसमोरच पार्थ फराळाला ‘राम शिंदेंच्या’ घरी
यावेळी रोहित पवार म्हणाले, आज मी चौंडीमध्ये विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहे. विकासकामांसाठी जो निधी आणला होता आणि आणला आहे त्या कामांचे आज उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. अनेक मान्यवर तिथे येणार आहेत, लोक असणार आहेत. दिवाळी फराळ आयोजित करणे महत्वाचे आहे, पण विकासकामे देखील महत्वाची आहेत. फराळाला जाणे हे चुकीचे नाही. त्यांच्या घरी जाऊन फराळ खाणं हे काही मोठ्या नेत्यांसाठी महत्वाचे असू शकते, पण विकासकामेही झाली पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
रोहित पवारांसमोरच पार्थ पवार शिंदेंच्या घरी :
आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे आज (16 नोव्हेंबर) आपल्या मतदारसंघातील चौंडी येथे विविध विकासकामांचे उद्घाटन करणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील युवा संघर्ष यात्रेचा शुभारंभही होणार आहे. चौंडीमध्ये रोहित पवार यांची सभा देखील पार पडणार आहे. यानिमित्ताने आज चौंडीमध्ये ठिकठिकाणी रोहित पवार यांचे बॅनर लावण्यात आले आहे.
अद्वय हिरेंना अटक अन् मालेगावची विधानसभा : राऊतांनी सांगितला दादा भुसेंचा ‘राजकीय प्लॅन’
याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) देखील चौंडीत येणार आहे. रोहित पवारांचे राजकीय शत्रू असलेले आमदार राम शिंदे यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला पार्थ हजेरी लावणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे देखील बॅनर्स आमदार राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले आहे. दरम्यान, कार्यक्रमाचे निमित्त जरी दिवाळी फराळाचे असले तरी मात्र या निमिताने आगामी निवडणुकांची तयारी व मोठे शक्तिप्रदर्शन हे नेतेमंडळींकडून केले जात आहे.