Nilesh Lanke Criticize Sujay Vikhe on Nagar-Manmad Road : लोकसभा निवडणुकांना वर्ष पूर्ण झाले. यामध्ये अहिल्यानगरमध्ये सुजय विखेंना पराभूत करून आमदारकी ते खासदारकी असा प्रवास करणारे निलेश लंके यांनी खासदार म्हणून आपल्या वर्षभराच्या कार्यकाळमध्ये काय-काय कामं केली. त्याचा लेखाजोखा घेण्यासाठी लेट्सअप मराठीने खासदारांचे रिपोर्ट कार्ड या खास कार्यक्रमामध्ये त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी विविध कामांबद्दल माहिती दिली. यामध्ये नगर शहरातील बहुचर्चित असा नगर-मनमाड रस्त्यावर बोलताना त्यांनी माजी खासदार सुजय विखेंवर टीकास्त्र सोडल्याचं पाहायला मिळालं.
काय म्हणाले निलेश लंके?
खासदार म्हणून वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर आपण मतदार संघातील विविध रस्त्यांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यात मी नगर शहरातील बहुचर्चित असा नगर-मनमाड रस्त्यासाठी देखील गडकरींकडे मागणी केली. त्यामुळे आता ही रस्ता होण्यास कोणताही अडथळा येणार नाही. लवकरच या रस्त्याच्या भूमिपुजनाचा नारळ फोडला जाईल. तसेच जेव्हा मी नगर पार्थर्डी रस्त्यासाठी आंदोलन केल्यानंतर तो रस्ता झाला.
‘थोडं संवेदनशीलपणे बोलत चला…’; बाळासाहेब थोरातांनी टोचले कृषिमंत्र्यांचे कान
त्यावेळी देखील श्रेयवाद झाला. विखेंनी देखील आमच्या कार्यकाळात हा रस्ता झाल्याचे बॅनर लावले होते. मात्र राजकारणात दोन वर्ग असतात. एक स्वत: च केलेल्या कामांवर बोलणारा आणि दुसरा कोणतही काम न करता दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेणारा असतो. पण मी त्याकडे दुर्लक्ष करतो. असं म्हणत लंके यांनी सुजय विखेंवर नगर-मनमाड रस्त्यावर बोलताना त्यांनी माजी खासदार सुजय विखेंवर टीकास्त्र सोडल्याचं पाहायला मिळालं.