Nilesh Lanke : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी रस्त्याच्या कामावरून विखेंना टोला लागवला आहे. ते म्हणाले की, ‘काहींना काम नसतात ते बोर्ड लावत बसतात’. लंके हे पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना ही टीका केली आहे.
काहींना काम नसतात ते बोर्ड लावत बसतात…
यावेळी पत्रकारांनी लंकेना प्रश्न विचारला की, तुम्ही नगर पाथर्डी रस्त्यासाठी आंदोलन केलं होतं. ते काम झालं. त्यानंतर त्याचे बोर्डही दिसायला लागले आहेत. त्यावर लंके म्हणाले की, काही लोकांना सवय असते की, काम शून्य करायचं पण श्रेय घ्यायला सगळ्यात पुढे असतात. तर नगर पाथर्डी रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता.
Kangana Ranaut: ‘इमर्जन्सी’ विषयी कंगनाची मोठी घोषणा; ट्वीट करत म्हणाली, ‘मी या चित्रपटासाठी…’
या रस्त्यावर 450 लोकांचा बळी गेला. शेवटी मला त्यासाठी उपोषण करावं लागलं. तसेच मी फक्त उपोषण केलं नाही. तर काम देखील सुरू केलं. त्याची दखल उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी घेतली. नितीन गडकरींना माहिती दिली. तर काम सुरू झालं तेव्हाच मी उपोषण सोडलं. त्यामुळे हे काम मी आणि माझ्या सहकाऱ्यांमुळे झालं. मात्र काहींना काम नसतात ते बोर्ड लावत बसतात. अशा शब्दांत लंकेंनी विखेंना नगर पाथर्डी रस्त्याचे श्रेय घेतल्याची टीका केली.
तसेच त्यांना विचारण्यात आलं की. येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यांत नवं मंत्रीपद मिळणार आहे. त्यात लंकेंचं नाव आहे का? त्यासाठी अजित पवारांनी लंकेंची भेट घेतली का? त्यावर लंके म्हणाले की, मला काही माहिती नाही. तसेच अजित पवारांची भेट ही या मंत्रिपदाबाबत नव्हती असं स्पष्टीकरण यावेळी दिलं.
दरम्यान आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी लंके यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तर लंके कुटुंबाने देखील यावेळी अजित पवार यांचं स्वागत करत आदरातिथ्य केलं. तर अजित पवारांच्या लंकेच्या घरी जाण्याने लंकेंच्या आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळणार का? या चर्चांना देखील उधान आले आहे.