Nilesh Lanke NCP Political Crisis : अहमदनगर राष्ट्रवादीमधील बंडानंतर आता शरद पवार यांचा एक गट व अजित पवार यांचा एक गट निर्माण झाला आहे. यातच आमदारांना आपल्या गटात सामील करण्यासाठी राजकीय मंडळींकडून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातील आमदार सध्या दुविधा मनस्थितीमध्ये आहे. यातच आमदार निलेश लंके यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्टपणे जाहीर केली नाही. मात्र पक्षाच्या एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. मतदार संघाचा विकास, भविष्यातील फायदे – तोटे पाहून तसेच काळजावर दगड ठेऊन काही निर्णय हे घ्यावे लागतात असे सूचक विधान पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी केले आहे. ( Nilesh Lanke says some decisions have to be taken with care in NCP Political Crisis )
Baipan Bhari Deva’ने तोडला बॉक्स ऑफिसचा रेकॉर्ड! कमाईचा आकडा पाहून केदार शिंदे म्हणाले…
पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित बूथ मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सध्या राष्ट्रवादीच्या फुटीवर भाष्य केले. यावेळी बोलताना लंके म्हणाले. राष्ट्रवादी हा परिवार आहे. तो काही अशा घटनांनी तुटणार नाही. पक्ष कधी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. कुटुंबामध्ये एखादा निर्णय झाला की हा प्रत्येकाला मान्य असतो असं नाही. मला अनेकांच्या प्रतिक्रिया येत असतात की तुम्ही शरद पवारांबरोबर जा तर काहींचं मत आहे की आपण अजित पवार यांच्यासोबत जावं… मात्र मी राष्ट्रवादी बरोबर जाणार असं प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले आहे.
भाजपात भाकरी फिरली; पराभवाच्या भीतीने बदलले प्रदेशाध्यक्ष
तसेच पुढे बोलताना लंके म्हणाले, इथं काही जण सात ते आठ वेळा आमदार झाले मात्र त्यांना देखील या परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यावा याबाबत समजत नाही. मात्र आपण तर पहिल्या टर्मचे आमदार आहोत म्हणून आपण एवढ्या जलदगतीने निर्णय नाही घेऊ शकत. कधी कधी काही निर्णय घेताना काळजावर दगड ठेऊन निर्णय हा घ्यावा लागत असतो. तसेच कुटुंबामध्ये सर्वांचे एकमत हे होत नसते यामुळे निर्णय हे वेगळे घयावे लागत असतात.
दरम्यान असे असले तरी मतदारसंघाचा देखील विचार हा करावा लागत असतो. मतदारसंघाचा विकास कसा होईल या दृष्टीने काही निर्णय घ्यावा लागत असतात. आपण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचा मला भविष्यात काय फायदा व काय तोटा होणार याकडे लक्ष द्यावे लागत असते. राजकारणातील पुढील भविष्य पाहून देखील काही निर्णय घ्यावे लागतात असे सूचक वक्तव्य निलेश लंके यांनी केले आहे.