मालेगावचा ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही; संजय राऊतांनी भुसेंना ललकारलं

नाशिक : शिवसेना ठाकरे (Shivsena Thackeray Group)गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी मालेगावमध्ये शिंदे गटावर (Shinde Group)जोरदार टीका केली आहे. मालेगावमध्ये (Malegaon)एक फिल्म इंडस्ट्री (Film Industry)आहे. त्याला म्हणतात मालेगाव के शोले, हे मालेगावचे शोले भडकले आहेत. शिवसेना काय आहे? हे पाहायचे असेल तर त्या निवडणूक आयोगाने (Election Commission)इथे येऊन पाहावं. निवडणूक आयोगाच्या बापाला विचारुन बाळासाहेब […]

Sanjay Raut Dada Bhuse

Sanjay Raut Dada Bhuse

नाशिक : शिवसेना ठाकरे (Shivsena Thackeray Group)गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी मालेगावमध्ये शिंदे गटावर (Shinde Group)जोरदार टीका केली आहे. मालेगावमध्ये (Malegaon)एक फिल्म इंडस्ट्री (Film Industry)आहे. त्याला म्हणतात मालेगाव के शोले, हे मालेगावचे शोले भडकले आहेत. शिवसेना काय आहे? हे पाहायचे असेल तर त्या निवडणूक आयोगाने (Election Commission)इथे येऊन पाहावं. निवडणूक आयोगाच्या बापाला विचारुन बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray)शिवसेना स्थापन केली नव्हती, असा सणसणीत टोला यावेळी खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे नावाचा एक अद्भूत माणूस पृथ्वीवर जन्माला आला आणि त्याने या महाराष्ट्रावर या देशावर शिवसेना नावाचं एक महावकाव्य निर्माण केलं ती ही शिवसेना आहे. ही समोर बसलेले जे शिवसैनिक आहेत ते प्रामाणिक शिवसैनिक असल्याचेही यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले. यावेळी राऊतांनी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसेंवरही (Dada Bhuse)जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, मालेगावचा ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही, असं म्हणत संजय राऊतांनी भुसेंना ललकारलं आहे.

Ajit Pawar : ‘जिल्हा बॅंकेत शेण खाणाऱ्याला असा झटका देणार की…’ राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना इशारा

ही प्रामाणिक शिवसेना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवेल आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करील, असेही खासदार संजय राऊत म्हणाले. आहे का हिंमत कोणाची त्या शिवसेनेशी लढण्याची सांगा असेही ते यावेळी म्हणाले. आज उद्धव ठाकरेंचं मालेगावमध्ये आगमन झाले आहे. मालेगावच्या त्या मोसम पूलावरुन ते वाजतगाजत शिवगर्जना करत ते पोहोचले आहेत. सकाळपासून टीव्हीला बातम्या सुरु होत्या, आज शिवसेनेची तोफ धडडणार म्हणून. पण यावेळी राऊत म्हणाले की, मालेगावचा ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही, असं म्हणत त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसेंना ललकारलं आहे.

त्याचवेळी खासदार राऊत म्हणाले की, मग आपण ही सभा मालेगावमध्ये कशासाठी घेत आहोत? त्यांनी सांगितले की, मालेगावमध्ये सभा यासाठी घेत आहोत की, महाराष्ट्राला देशाला संदेश देण्यासाठी की शिवसेना तुटलेली नाही, शिवसेना वाकलेली नाही, शिवसेना झुकलेली नाही, सगळ्या जातीधर्माचे लोक या मालेगावमध्ये नाही तर संपूर्ण राज्यातील लोकं शिवसेनेच्या तुमच्यापाठिशी उभा आहेत. तुमच्यासारखा प्रामाणिक नेता आम्हाला मिळाला आहे. तुमच्या प्रामाणिकपणापुढे हा संपूर्ण महाराष्ट्र उसळून तुमच्यासमोर उभा राहिलेला आहे, असेही यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले.

Exit mobile version