Ajit Pawar : ‘जिल्हा बॅंकेत शेण खाणाऱ्याला असा झटका देणार की…’ राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना इशारा
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा बॅंकेच्या (Ahmednagar District Bank Election) चेअरमन पदाच्या निवडणुकीत चुकीची गोष्ट घडली आहे. यामध्ये काय घडलं? काय नाय घडलं? कोणी शेण खाल्लं हे मला चांगलं माहिती आहे. फक्त मी आज इथं बोलणार नाही. त्यांना असा झटका देणार की दहा पिढ्या त्याला आठवलं पाहिजे, असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांना दिला आहे. ते कर्जत येथे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या सायकल वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी बंडखोरी करत भाजपला मदत केली होती. यामुळे शिवाजी कर्डिले बॅंकेचे अध्यक्ष झाले आहेत. जिल्हा बॅंकेतील पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. ते पुढं म्हणाले, जणाची नाही मनाची ठेवायची होीत. 14 लोकं राष्ट्रवादी आणि काँग्रेसची असताना चंद्रशेखर घुलेंसारखा माणूस पराभूत होतो. माणसं दिवसा आमच्या बरोबर आणि मतदानाला त्यांच्याबरोबर. असली अवलाद जर इंथ असेल काही त्यांचे खरे नाही. असली माणसं नकोत आम्हाला. तुम्हाला जायचं तिथं जावा. आम्ही दहा गरीब लोकांकडे जाऊन हात जोडू. ती गरीब लोक विश्वासाने आपल्याबरोबर राहतील. गरीबं शब्दाला पक्की असतात पण पदं दिलेली? असा इशारा अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
तुम्ही रोहितला आमदार केलं, त्याने माझ्यापेक्षाही जास्त काम केलं; अजितदादांनी दिली कौतुकाची थाप
साहेबांपेक्षा मी जास्त कामं केली, माझ्यापेक्षा रोहितने मतदारसंघात जास्त कामं केली आहेत. साडेचार हजार कोटींची कामं कर्जत-जामखेड मतदारसंघात केली आहेत. गेल्या दहा वर्षात जेवढा निधी आला नाही तेवढा निधी रोहितने तीन वर्षात आणला आहे. कामं कधी थांबत नसतात एक झाले की दुसऱ्याची अपेक्षा असते. रयत शिक्षण संस्थने शारदाबाई पवार यांच्या नावाने सुंदर नाट्यग्रह बांधले आहे. यापूर्वीच्या आमदार, खासदारांनी कधी ही कामे करण्याचा विचार केला का? मागच्या आमदाराचे हात कोणी बांधले होते का? का कोणाच्या मनात ह्या कल्पना आल्या? असा सवाल करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राम शिंदेंवर हल्लाबोल केला.
कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसीसाठी 1200 एकर जागेची मंजूरी झाली आहे. परंतु आज आमचे काही विरोधक त्यांच्यावर सही होऊ देत नाहीत. पण सध्या जे मंत्री आहेत त्यातील दहा मंत्र्यांसोबत आम्ही काम केलेलं आहे. ते विरोधात असताना काम करायची नाहीत ही आमची कधी भूमिका नव्हती. हे सत्तेत आल्यावर आमच्या कामांना स्थगिती दिली आहे. त्यातून काय साधलं? हेच का तुमचं गतीमान सरकार? असा सवाल करत अजित पवार यांनी एमआयडीसीवरुन राम शिंदेंना लक्ष केले.
चंद्रकांत खैरे थकलेले नेते, त्यांना टार्गेट करू नका; शिरसाटांनी मेळाव्यातच सांगितले..
कर्जत-जामखेडमधील सगळी कामं झाली नाहीत. अजून बरीच कामं करायची बाकी आहेत. मी पिंपरी-चिंचवड, पुणे आणि बारामती मतदारसंघाचा विकास केला. काम करत असताना अनेकांबरोबर वाईटपणा येतो. काम करत असताना मुद्दाम कोणालाही वाऱ्यावर सोडण्याची आमची मानसिकता नसते, असे अजित पवार यांनी सांगितले.