महापालिकेच्या पहिल्या मजल्यावरून पडून एकजण गंभीर जखमी

person seriously injured after falling from the first floor Municipal Corporation : अहमदनगर (Ahmednagar) महापालिकेच्या (Ahmednagar mahapalika)नवीन प्रशासकीय इमारतीत आज दुपारी एक अपघात (Accident)घडला आहे. महापालिकेच्या पहिल्या मजल्यावरील संगणक विभागासमोरच्या गॅलरीतून एक नागरिक खाली पडला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. गणेश राहिंज (रा. वांबोरी, ता. राहुरी) असे जखमी व्यक्तीचे नाव असल्याचे समजले आहे. विधवा […]

Ahmednagar Corporation

Ahmednagar Corporation

person seriously injured after falling from the first floor Municipal Corporation : अहमदनगर (Ahmednagar) महापालिकेच्या (Ahmednagar mahapalika)नवीन प्रशासकीय इमारतीत आज दुपारी एक अपघात (Accident)घडला आहे. महापालिकेच्या पहिल्या मजल्यावरील संगणक विभागासमोरच्या गॅलरीतून एक नागरिक खाली पडला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. गणेश राहिंज (रा. वांबोरी, ता. राहुरी) असे जखमी व्यक्तीचे नाव असल्याचे समजले आहे.

विधवा महिलांना मिळणार नवी ओळख, राज्य सरकारच्या हालचाली सुरु…

आज दुपारी महापालिकेत अचानक काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. तसेच जखमी व्यक्तीचे वेदनेने ओरडत असल्याचा आवाज आल्याने महापालिकेतील कर्मचारी धावत गेले. त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्याच्या कुटुंबीयांनाही या बाबत माहिती देण्यात आली आहे. तो व्यक्ती महापालिकेत का आला होता? हे मात्र समजू शकले नाही. हा गणेश राहिंजचा भाऊ शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. त्याला भेटून तो महापालिकेत आला होता, असे समजले आहे.

अचानक महापालिकेत मोठा आवाज आल्याने एकच खळबळ उडाली. त्या ठिकाणी नेमकं काय झालं? हे पाहण्यासाठी सर्वांनी एकच गर्दी केली.

महापालिकेमध्ये असलेल्या संगणक विभागाच्या समोर तो तरुण मोकळ्या जागेत उभा होता, त्यानंतर अचानक तो तरुण खाली पडला. ही घटना घडल्याचे पाहताच संगणक विभागातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ ही बाब वरिष्ठांना सांगितली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातून रुग्णवाहिका बोलवण्यात आली. त्यानंतर त्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version