Download App

अहमदनगर जिल्ह्यात अफूची शेती, 15 लाखांचा गांजा-अफूची झाडे जप्त

  • Written By: Last Updated:

अहमदनग : अफगाणिस्तानमध्ये शेतात गांजा पीकविला जात असल्याच्या बातम्या अनेक वेळा आपण वर्तमानपत्रातून वाचल्या असतील. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील दोन पठ्ठ्यांनी चक्क शेतात अफू व गांजा पीकविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार नेवासे तालुक्यातील शहापूर व देवगाव येथे समोर आलाय.

या प्रकरणी शहापूरचा बाबुराव लक्ष्मण साळवे व देवगावचा रावसाहेब भागुजी गिलबिले याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद के स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहापूर व देवगावमध्ये आज छापे टाकले. यात शहापूर येथील बाबुराव साळवेच्या गव्हाच्या शेतात अडीच फूट उंचीची दोन व घरासमोर आठ फूट उंचीची झाडे तर पोत्यावर गांजाचा पाला वाळत टाकल्याचा आढळून आला. हा एक लाख 11 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पुद्दुचेरीची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने, शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय 

देवगावच्या रावसाहेब गिलबिलेने चक्क शेतात अफूची लागवड केल्याचे आढळून आले. तेथून 13 लाख 84 हजार रुपये किमतीचा 69 किलो 500 ग्रॅम लहान-मोठी 621 अफूची झाडे व बोंडे हस्तगत करण्यात आली. दोन्ही ठिकाणांतील मिळून 14 लाख 95 हजार 420 रुपये किमतीची 624 लहान-मोठी गांजा व अफूची झाडे पथकाने हस्तगत केली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक संदीप दरंदले यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात आमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

follow us