पुद्दुचेरीची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने, शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

पुद्दुचेरीची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने, शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

देशात कोरोनानंतर आता H3N2 विषाणूच्या प्रसारात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशातल्या अनेक राज्यांमध्ये H3N2 इन्फ्लुएंजा विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून आले आहेत. पुद्दुचेरीमध्ये या विषाणूच्या प्रसारात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुद्दुचेरीत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुद्दुचेरीचे शिक्षणमंत्री ए नमासिवम यांनी याबाबत माहिती दिली आहे.

चमत्कार: एम्सच्या डॉक्टरांची न जन्मलेल्या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया

पुद्दुचेरीमध्ये 16 ते 26 मार्चपर्यंत सर्व शाळा बंद राहणार आहेत. पुद्दुचेरीमध्ये 4 मार्चपर्यंत H3N2 इन्फ्लुएंजा विषाणूचे 79 रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रशासित प्रदेशांतील आरोग्य विभागात 11 मार्चला दिली. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे आत्तापर्यंत पुद्दुचेरीमध्ये एकाही रुग्णाच मृत्यू झाल्याची नोंद आढळून आलेली नाही.

सत्तासंघर्षाच्या सुनावणीत राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, सरन्यायाधीशांनी विचारले हे प्रश्न

H3N2 इन्फ्लुएंजा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुद्दुचेरी, कराईकल, माहे आणि यानाम या चारही विभागातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इन्फ्लूएंझाचा प्रसार, विशेषत: मुलांमध्ये होत असल्याने सरकारने खाजगी संस्था आणि सरकारी अनुदानित शाळांसह प्राथमिक ते आठवीपर्यंतच्या शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृह आणि शिक्षण मंत्री ए नम्माशिवयम यांनी विधानसभेत बोलताना दिली आहे.

प्रत्येकाने सुरक्षितपणे काळजी घेतली तर या विषाणूपासून आपण दूर राहू शकतो. हा साथीचा आजार असल्याने हाताद्वारे लगेच त्याची बाधी होण्याची शक्यता असते. त्यासाठी योग्य पद्धतीने आणि साबणाने प्रत्येकाने हात स्वच्छ धुतले पाहिजे, असं आवाहनही डॉक्टरांकडून केलं जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube