Ahmednagar News: बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील विद्यार्थी, नागरिक व पत्रकार यांच्यासाठी ग्रासरूट जर्नालिझम : संधी व उपयोगिता याविषयावर शुक्रवार दि.०८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था, अहमदनगर या ठिकाणी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देतांना त्यांनी सांगितले कि, आजच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक सामान्य नागरिक हा विविध समाज माध्यमांतून व्यक्त होत असतो. ग्रासरूट जर्नालिझमच्या माध्यमातून तळागाळातील समस्यांना, सामाजिक प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळत आहे. अनेक नागरिक पोर्टल तसेच यूट्यूब चॅनल देखील चालवितात. पत्रकार देखील समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. डिजिटल समाज माध्यमांचा वापर करून कशा पद्धतीने पत्रकारिता करता येऊ शकते याबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे. ग्रासरूट जर्नालिझमच्याबाबत जागृती निर्माण व्हावी तसेच ग्रासरूट जर्नालिझमच्या अनुषंगाने माध्यम क्षेत्रातील संधी लक्षात याव्यात यादृष्टीकोनातून सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
Maratha Reservation : आत्ता या, ढंपर भरुन पुरावे देतो; तातडीने अध्यादेश काढावा : मनोज जरांगे
या कार्यशाळेस औरंगाबाद येथील माजी कुलगुरू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभागाचे माजी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. सुधीर गव्हाणे तसेच मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार अभिजीत कांबळे मार्गदर्शन करणार आहेत.
चीनमध्ये सरकारी कर्मचारी, एजन्सींना आयफोन वापरावर बंदी, अॅपल हेरगिरी करते?
सदर कार्यशाळेमध्ये माध्यम क्षेत्राची आवड असलेले विद्यार्थी विद्यार्थी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सहभागी होवू शकतील. सदर कार्यशाळा मोफत असून त्यासाठी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक असेल. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सहभागीतांना संस्थेमार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी व पत्रकारांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. सुरेश पठारे यांनी केले आहे. कार्यशाळेच्या नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी ०२४१- २३४६३२८ अथवा ८७८८४१२७८० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.