Download App

HSC Paper Leak Case : पेपर फुटीचे धागेदोरे नगरपर्यंत, ‘या’ महाविद्यालयाच्या प्राचार्यासह शिक्षकांना बेड्या

अहमदनगर : बारावीच्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट अहमदनगर जिल्ह्यापर्यंत पोहचले आहेत. ही पेपरफुटी मुंबईत झाली होती. मात्र आता या प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातून मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर एका अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. आश्चर्य म्हणजे या प्रकरणामध्ये एका प्रचार्यासह शिक्षकांचा देखील समावेश आहे.

अटक केलेल्या आरोपींमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील रूईछत्तीसी येथील मातोश्री भागोबाई भांबरे कृषी व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब लोभाजी अमृते, किरण संदीप दिघे, सचिन दत्तात्रेय महारनवर, अर्चना बाळासाहेब भामरे व वैभव संजय तरटे यांचा समावेश आहे. दादर येथील अ‍ॅंटॉनियो डिसिल्व्ह हायस्कूलच्या शिक्षिकेच्या तक्रारीवरून यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्ण प्रकरण असे की,

दादर येथील अ‍ॅंटॉनियो डिसिल्व्ह हायस्कूलमध्ये परीक्षा केंद्रात मोबाईल सापडला होता. या मोबाईलमधील सोशल मीडियावर 12 वी गणिताचा पेपर सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका लिक झाली होती. त्यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील रूईछत्तीसी येथील कॉलेजच्या संबंधित आरोपींनी परिक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर ती व्हॉट्सअपवर पाठवून प्रश्नपत्रिका फोडली होती.

Buldhana : बारावीच्या पेपरफुटी प्रकरणी चार शिक्षकांचे निलंबन

या प्रकरणी मुंबईच्या पोलीस पथकाने शोध घेत अहमदनगर शहरातील एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता मोठी साखळी उघड झाली आहे. पेपर फोडण्यासाठी 10 हजार रुपये घेऊन सोशल मीडियावर पेपर लिक केले जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात धाडले आहे. तर एक प्राचार्य, दोन शिक्षक व दोन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.

Tags

follow us