Download App

पारनेरचे नगराध्यक्ष विजय औटी देणार राजीनामा, चर्चांना उधाण

  • Written By: Last Updated:

पारनेरचे नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी हे पुढील आठवडयात आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आ. नीलेश लंके यांच्याकडे आपण राजीनामा सुपूर्द करणार असे औटी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गेल्या सव्वा वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला. (Parner Mayor Vijay Ooti will resign)

यावेळी बोलताना औटी म्हणाले, सव्वा वर्षासाठी नगरपंचायतीचा नगराध्यक्ष म्हणून कारभार हाती घेतल्यानंतर पाण्याची समस्या मोठी होती. त्यातूनच अधिकारी व माझ्यामध्ये तू तू मै मै झाली. जुन्या मोटारींचा हिशेब मागितल्याचा राग अधिकाऱ्याला आला आणि माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांवर सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा मी सहन केला. त्यानंतर मी पारनेर बाहेर असताना फसवणूकीचा माझ्यासह माझ्या भावावर दुसरा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हयातील फिर्यादींना न्यायालयाने तुमच्या नावावर तुमची जमीन करून घ्या असे स्पष्टपणे सांगितले. या खोट्या गुन्हयातून मी व माझा भाऊ सहिसलामत सुटलो.

माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार नीलेश लंके यांनी पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी संधी दिली असून ठरल्याप्रमाणे सव्वा वर्षाचा काळ पूर्ण होत असल्याने मी माझ्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा 22 जूनला देणार असल्याची माहिती नगराध्यक्ष विजय औटी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी नगरसेवक नंदकुमार औंटी यांच्या सह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर दुसरीकडे या कार्यकाळात माझ्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल झाले असून तरीपण माझ्या परीने आमदार लंके यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेरच्या पाणी प्रश्न सह इतर सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले असल्याची नगराध्यक्ष विजय औटी यांनी सांगितले.

नगरकरांसाठी मोठी बातमी! सीना नदीची हद्द निश्चितीची मोहिम पूर्ण

नगराध्यक्षपदासाठी सभापती डॉ. विद्या बाळासाहेब कावरे व नगरसेवक नितीन अडसूळ यांच्यामध्ये चुरस असून या संबंधीचा निर्णय आमदार लंके घेणार आहेत. पुढे औटी म्हणाले माझ्या कार्यकाळात संविधानाची मिरवणूक काढत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू यांच्या हस्ते चांगला कार्यक्रम केला आहे.पारनेर शहरात हिंदू मुस्लिम ऐय टिकविण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक सलोख व शांतता अबाधित राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहे. तर दुसरीकडे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.

माझ्या वाढदिवसाला 7 कोटी रुपयांचा विकास कामांचा शुभारंभ केला आहे. तर शहीद जवान बाबासाहेब कावरे यांच्या नावाने मार्ग नामकरण केले आहे. प्रजासत्ताक दिनी स्वच्छता कर्मचार्‍यांच्या हस्ते झेंडावंदन करून नवा पायंडा पाडला आहे. माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला नगराध्यक्ष पदाचा मान दिला हे महत्त्वाचे आहे. मनकर्णिका नदी काशीनंतर पारनेरला असून तीर्थक्षेत्राबरोबर पर्यटन विकास करण्याचा माणसं होता, तो अधुरा राहिला असल्याची खंत नगराध्यक्ष विजय औटी यांनी व्यक्त केली. तर कचर्‍यापासून खत निर्मिती हा महत्त्वाचा प्रकल्प सुरू केला असून अल्प दरात खत उपलब्ध शेतकर्‍यांना देणार असल्याचे नगराध्यक्ष विजय औटी म्हणाले.

Tags

follow us