नगरकरांसाठी मोठी बातमी! सीना नदीची हद्द निश्चितीची मोहिम पूर्ण
अहमदनगर – सीना नदीची (Sina River) हद्द निश्चितीसाठी गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिका अतिक्रमण विभाग, कुकडी पाटबंधारे विभाभ आणि भूमिअभिलेख विभाग अत्याधुनिक यंत्रणेद्वारे मोजणी करत होते. अखेर ही मोजणी पूर्ण झाली असून, याच मोजणीनुसार अभिलेखाची पडताळणी करून लवकरच सीना नदीची हद्द (border of the Sinai River)ठरवली जाणार आहे. (Sina river demarcation mission completed; The limits will be fixed soon)
शहरात सीना नदीचा 14 किलोमीटरचा भाग आहे. मात्र, शेती, वीटभट्या आणि पक्क्या बांधकांमांच्या अतिक्रमणामुळं सीना नदीचे नगर शहारतील अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर होते. नदीच्या पात्राची व्याप्ती आणि पूररेषा याबाबत अनेक वर्षांपासून संभ्रम होता. नदीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. सीना नदीच्या सीमांकनाबाबत न्यायालयाने संबंधित विभागाला नोटीस बजावली होती.
देवेंद्रजी, तुमची महाशक्ती सावरकरांना भारतरत्न कधी देणार? दानवेंचा रोखठोक सवाल
त्यांनंतर शहरात अतिवृष्टीने निर्माण होणारी पूरजन्य परिस्थिती व भविष्यातील संकट टाळण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी कुकडी पाटबंधारे विभागामार्फत पात्राची हद्द व पूररेषा निश्चित करण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सीना नदीची हद्द निश्चित करण्यासाठी भूमी अभिलेख विभाग व मनपा प्रशासन यांच्या संयुक्त कार्यवाहीनुसार नदीच्या लगत असणारे सर्व्हे नंबरची अत्याधुनिक यंत्रणेद्वारे मोजणी करण्यात आली आहे.
दरम्यान, आता ही मोजणी पूर्ण झाली असून लवकरच सीना नदीची हद्द ठरवली जाणार आहे. सदर मोजणी डावरे व ज्योती तिवारी यांनी काम पाहिले. मोजणी मापन हे आधुनिक अशा रोवरचा वापर करुन करण्यात आली आहे. संबंधित यंत्रणेला रेखांश, अक्षांश नुसार सीना नदीची हद्द कायम करून दिली जाणार आहे