Download App

शिंदे-फडणवीसांनंतर Sujay Vikhe यांच्यासाठी मोदी मैदानात; ‘या’ दिवशी नगरमध्ये सभा घेणार

PM Modi हे नगर दक्षिणेमधून महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी 6 मे रोजी अहमदनगरमध्ये येणार आहे.

PM Modi campaign meeting for Sujay Vikhe in Ahnmednagar : अहमदनगर ( Ahnmednagar ) लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आता प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. नगर दक्षिणेमधून महायुतीचे उमेदवार सुजय विखे ( Sujay Vikhe ) यांच्या प्रचारासाठी आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) हे मैदानात उतरले आहे. विखेंच्या प्रचारासाठी मोदी 6 मे रोजी नगरमध्ये येणार आहे. विखे यांच्या उमेदवारी अर्ज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही नगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यानंतर आता खुद्द मोदी नगर जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याने विखेंना मोठे पाठबळ मिळणार आहे.

Ahmednagar Lok Sabha : होम ग्राउंडमध्येच लंकेंना धक्का; माजी आमदाराचा सुजय विखेंना पाठिंबा

लोकसभा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून भाजपकडून यंदा 400 पारचा नारा दिला जातो आहे. दरम्यान राजकीय समीकरणे बदलले असल्याने तुमची देखील मोठी कस लागली आहे. राज्य चर्चेत असलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकी महायुतीकडून सुजय विखे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

अजय देवगणच्या ‘मैदान’चा मोठा फटका’, ‘BMCM’ सिनेमाला, 21व्या दिवशी किती झाली कमाई?

लंके यांचे एंट्रीने नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत चांगली चुरस निर्माण झाली आहे. लंकेसाठी साठी शरद पवार यांनी नगर जिल्ह्यात आतापर्यंत तीनदा सभा घेतले. आता सुजय विखे यांच्या विजयासाठी खुद्द नरेंद्र मोदी हे लोकसभेच्या मैदानात उतरले आहे. सहा मे रोजी नगर शहरातील सावेडी येथे मोदी यांची मोठी जाहीर सभा पार पडणार आहे. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मोदी नगर जिल्हा दौऱ्यावर असल्याने भाजप पदाधिकाऱ्यांकडून जयत तयारी करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांकडून तसेच लोकप्रतिनिधीं कडून संबंधित सभास्थळाची पाहणी करण्यात येत आहे. तसेच मोदी नगर जिल्ह्यात येणार असल्याने भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केले जाणार आहे. त्या अनुषंगाने मोठी तयारी देखील सुरू आहे. दरम्यान मोदींची सभा सुजय विखे यांना विजय मिळवून देणार का हे त्या काळात स्पष्ट होईलच.

follow us