राज्यात PM Modi यांच्या सभांचा धडाका, वेगवेगळ्या लूकने केले मतदारांना आकर्षित; पाहा फोटो

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi) यांच्या गेल्या दोन दिवसांपासून राज्यामध्ये सभांचा धडाका सुरू आहे.

यामध्ये 29-30 एप्रिलला मोदी यांच्या राज्यात तब्बल सहा सभा झाल्या त्यामध्ये सोलापूर, कराड, पुणे,माळशिरस, धाराशिव आणि लातूरचा समावेश आहे.

या प्रत्येक सभांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. तसेच मतदारांना आकर्षित करण्यासाठी स्थानिक मुद्द्यांना हात घातला.

तसेच या सहाही सभांमध्ये मोदी यांनी स्थानिक संस्कृतींना चालना देणारा पोशाख घालत वेगवेगळे लूक केल्याचं पाहायला मिळालं

यामध्ये पुण्यात मोदी यांनी पुणेकरांची सांस्कृतिक ओळख असणाऱ्या पुणेरी पगडी घालून सभेला संबोधित केलं.
