Download App

PM Modi : साईंच्या दर्शनापासून गोव्याला रवाना होईपर्यंत असा असणार मोदींचा नगर दौरा

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi ) आज (26 ऑक्टोबर) अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे येत आहे. या ठिकाणी ते अनेक विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा यावेळी पार पडणार आहे. मोदी हे शिर्डी येथे येणार असल्याने शिर्डी शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. यानंतर शिर्डीजवळील काकडी गावात पंतप्रधान मोदींची जनसभा होणार आहे.

मोदी काय बोलणार याकडे लक्ष?

राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच चिघळले आहे. यातच हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आता नेतेमंडळी देखील धावपळ करू लागले आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या दौऱ्यापुर्वीच काल दिल्लीला जाऊन आले आहेत. त्यामुळे आजच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेगळी घोषणा करतात का, याबाबतही उत्सुकता आहे. खास करुन राज्यात मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न ऐरणवीर आला असताना आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधा काही घोषणा करत विरोधक आणि समर्थकांनाही धक्का देणार का याबाबत उत्सुकता आहे.

Jayant Patil : ‘मोदीजी, फित कापून खुशाल श्रेय घ्या!’ ‘निळवंडे’ची आठवण सांगत जयंत पाटलांचा टोला

असा असणार मोदींचा शिर्डी दौरा

पंतप्रधान मोदी दुपारी 1 वाजता शिर्डीत दाखल होणारत् यानंतर पंतप्रधान मोदी साईबाबा समाधी मंदिराचं दर्शन घेत, पूजा करणार आहे. पंतप्रधान दुपारी 2 वाजता निळवंडे धरणाचं जलपूजन करणार यावेळी निळवंडे धरणाच्या कॅनलचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाईल.

Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे 1 कोटींच्या खंडणीची मागणी, गुन्हा दाखल

पंतप्रधान दुपारी 3.15 वाजता विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील. सुमारे 7 हजार 500 कोटींच्या या प्रकल्पात आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल, गॅस क्षेत्रातील प्रकल्पांचा समावेशया प्रकल्पांचे भूमीपूजन केल्यानंतर पंतप्रधान सायंकाळी 6.30 वाजता गोव्याला रवाना होतील.

मोदी तिसऱ्यांदा साईचरणी नतमस्तक होणार

नरेंद्र मोदी हे 2008 साली गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते शिर्डी येथे आले होते. त्यानंत. 2018 साली देशाचे पंतप्रधान झाल्यावर मोदी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आले होते. दरम्यान आज 26 ऑक्टोबर 2023 म्हणजे आज तिसऱ्यांदा ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. तब्बल ५ वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साई बाबाचे दर्शन घेणार आहेत. यातच आगामी काळात निवडणुका होणार असल्याने मोदींचा नगर जिल्हा दौऱ्याला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य मंत्रीमंडळातील इतर मंत्री, राज्यमंत्री, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थितीत राहणार आहेत.

Tags

follow us