Download App

Ahmednagar Fake Degree : अहमदनगरमध्ये बनावट पदव्या विक्रीचं रॅकेट उघड; थेट दिल्लीतून चालायचा धंदा

Ahmednagar Fake Degree : गेल्या काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये विविध गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. त्यामध्ये आता एक बनावट पदव्या विक्रीचं रॅकेट उघड झालं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा धक्का बसला आहे. हा प्रकार शहरातील मुख्य वसाहतीतील भागातून दिवसाढवळ्या चालत होता. त्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. ( Police Succeed in expose Ahmednagar Fake Degree racket Delhi Connection )

Chandrasekhar Bawankule : आगामी निवडणुकांसाठी BJP ने कसली कंबर, ३ कोटी घरापर्यंत पोहचणार

यामध्ये अहमदनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरु होता. विविध विद्यापीठांच्या बनावट पदव्या तसेच 10 वी , 12 वी चे बनावट गुणपत्रके, प्रमाणपत्रे तयार करून त्याची 50 ते 60 हजार रुपयांना विक्री केली जात होती. या पदव्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा तोफखाना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हे रॅकेट चालविणारा एक जण पकडण्यात आला असून त्याच्याकडून 10 वी, 12 वी चे बनावट गुणपत्रके, काही बनावट पदव्या जप्त करण्यात आल्या आहेत.

रॅकेट धागेदोरे थेट दिल्लीपर्यंत

या बनावट पदव्याच्या रॅकेटचे धागेदोरे थेट दिल्लीपर्यंत असल्याचं उघडकीस आलं आहे. कारण अहमदनगर शहरात विविध विद्यापीठांच्या बनावट पदव्या तसेच 10 वी , 12 वी चे बनावट गुणपत्रके, प्रमाणपत्रे तयार करून त्याची 50 ते 60 हजार रुपयांना विक्री केली जात होती. मात्र हे बनावट पदव्या व गुणपत्रके त्याचे दिल्ली येथील आरोपी अशोक नामदेव सोनवणे (वय 37 ) याच्या ओळखीचे सचिन व चेतन शर्मा हे बनवून देत असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

अजितदादांची प्रत्येक फाईल माझ्याकडे येणार! नाराज आमदारांना फडणवीसांचा ‘शब्द’

त्यानंतर आता पुढे आरोपी अशोक सोनवणे याने किती जणांना अशा बनावट पदव्या विकल्या आहेत? याचा शोध पोलीस घेत असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट पदवीधर तसेच विविध पदव्या घेतलेले समोर येण्याची शक्‍यता आहे. विकलेल्या प्रमाणपत्रांबाबत अशोक सोनवणे याच्याकडे विचारपूस केल्यावर त्याने सांगितले की, हे बनावट प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे दिल्ली येथील माझे ओळखीचे सचिन तसेच चेतन शर्मा यांच्याकडून तयार करुन घेवुन ते 50 ते 60 हजार रुपयांना आलेल्या ग्राहकांना विक्री करत असल्याचे सांगितले.

तसेच यापुर्वी देखील बऱ्याच जणांना शिवाजी विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्‍त विद्यापीठ अशा विविध विद्यापीठांचे बनावट प्रमाणपत्रे तयार करुन दिलेली आहे. पोलिसांनी बनावट प्रमाणपत्रे तसेच त्याच्याजवळील सुमारे 750 हजार रुपये किमतीचे 2 मोबाईल जप्त केले. आता पोलीस अशोक सोनवणेच्या दिल्लीतील ओळखीच्या दोघांच्या मागावर असून किती जणांना अशा प्रकारे बनावट पदव्या विकल्या आहेत? याचा शोध घेण्यात येत आहेत.

Tags

follow us