Chandrasekhar Bawankule : आगामी निवडणुकांसाठी BJP ने कसली कंबर, ३ कोटी घरापर्यंत पोहचणार

Chandrasekhar Bawankule : आगामी निवडणुकांसाठी BJP ने कसली कंबर, ३ कोटी घरापर्यंत पोहचणार

Chandrasekhar Bawankule : आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका (lok Sabha and Legislative Assembly Elections) होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधानमोदींच्या विरोधात मोट बांधण्यासाठी विरोधकांची पाटण्यात बैठक झाली. तर आता भाजनेही जोरदार तयारी केली. मोदी सरकारने गेल्या 9 वर्षात अनेक योजना राबवल्या. त्या योजना महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘घर चलो’ अभियान राबविण्यात येतेय. या अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातील भाजपचे सर्व नेते व कार्यकर्ते ३ कोटी घरापर्यंत पोहचणार असून केंद्र सरकारच्या योजनांची माहिती ते सर्वांना देणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी सांगितलं. (BJP will reach 3 crore houses across the state Determination of Chandrasekhar Bawankule)

चंद्रशेखर बावनकुळे हे कामठी विधानसभा क्षेत्रात आमदार टेकचंद सावरकर यांच्यासह घर चलो अभियानात सहभागी झाले. कामठी विधानसभा क्षेत्रातील नागपूर ग्रामीण, कामठी व मौदा तालुक्यातील १५ गावांतील मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सरकारने मागील ९ वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडून समर्थन मिळविण्यासाठी घर चलो अभियान राबविण्यात येत आहे.

बावनकुळे यांनी सांगितलं, महाराष्ट्रातील सर्व आजी माजी आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ता यात सामील होणार आहेत. भाजपाने जाहीरनाम्यात दिलेली कामे पूर्ण झाल्याची माहिती जनतेपर्यंत पोहचून आम्ही देत आहोत. मतदारांकडून आम्ही मताचे कर्ज घेतले होते, ते विकासाच्या माध्यमातून परत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ६० हजार तर लोकसभा क्षेत्रातील साडेतीन लाख व महाराष्ट्रातील ३ कोटी घरांपर्यंत पोहचण्याचा आम्ही निर्धार केला आहे. मतदारांपर्यंत पोहचून ९०९०९०२०२४ या क्रमांकावर कॉल करून मोदींसाठी समर्थन मागणार आहोत, असेही ते म्हणाले.

दिवसभरात पंधरा गावांना भेटी
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नागपूर ग्रामीण तालुक्यातील डोंगरगाव येथून घर चलो अभियानाला सुरुवात केली. दिवसभराच्या दौऱ्यात त्यांनी नागपूर ग्रामीण तालुक्यातील खापरी, खापरी पुनर्वसन, बेलतरोडी, बेसा, पिपळा, हुडकेश्वर, नरसाळा, गोन्हीसीम, बहादुरा, खरबी, कामठी तालुक्यातील बिडगाव, भूगाव, वडोदा व मौदा येथे भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत नागपूर जिल्हा ग्रामीण सरचिटणीस अनिल निधान, अजय बोढारे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube