Download App

बुऱ्हानगरमधील ‘ती’ कारवाई खुन्नसेपोटी, प्राजक्त तनपुरेंचा सत्ताधारी आमदारांवर थेट निशाणा

तुळजाभवानी मंदिराचे पुजारी भगत यांचे बांधकाम केवळ खुन्नसेपोटी पाडण्यात आले. सरकारी यंत्रणेचा वापर करत आमदार शिवाजीराव कर्डिलेंनी हे पाप केलेय

  • Written By: Last Updated:

अहिल्यानगर – नगर तालुक्यातील बुऱ्हानगर (Burhanagar) येथील तुळजाभवानी मंदिराचे (Tulja Bhavani Temple) पुजारी भगत यांचे बांधकाम केवळ खुन्नसेपोटी पाडण्यात आले. सरकारी यंत्रणेचा वापर करत आमदार शिवाजीराव कर्डिलेंनी (Shivajirao Kardile)  हे पाप केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार प्राजक्त तनपुर (Prajakt Tanpure) यांनी केला आहे. कारवाई नियमानुसार झाली असेल तर आम्हाला काही हरकत नाही. मात्र कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता करण्यात आलेल्या कारवाईचा आम्ही निषेध करतो, असे यावेळी तनपुरे म्हणाले.

सनई-चौघडयांचे सूर, शेकडों प्रेक्षक अन् जिजाऊंच्या ओव्या, ‘रणरागिणी ताराराणी’ चा दिमाखात शुभारंभ! 

महसूल विभाग व बुऱ्हानगर ग्रामपंचायतीने अंबिका सांस्कृतिक भवनाने अतिक्रमण केल्याचे सांगत आज (ता. २०) कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईत मंगल कार्यालयाचा मोठा भाग जमीनदोस्त करण्यात आला. मात्र, राजकीय वैमनस्यातून ही कारवाई झाल्याचा आरोप अॅड. अभिषेक भगत यांनी केला आहे. यातच या मतदार संघातील आमदार शिवाजीराव कर्डिले आणि भगत यांच्यामध्ये असलेल मतभेद सर्वश्रुत आहे. यामुळेच ही कारवाई करण्यात आली असल्याचे भगत यांनी म्हटले आहे.

तर माजी आमदार तनपुरे म्हणाले की, राज्यात बहुमताने भाजपचे सरकार आले असल्याने आता सत्ताधारी मंडळींकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याचे कारस्थान केलं जात आहे. सर्वसामान्य जनता असो किंवा विरोधक असो, त्यांना त्रास दिला जातो आहे असा थेट आरोप प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे.

पहिल्याच सामन्यात लाजिरवाणा पराभव, पाकिस्तान उपांत्य फेरीत कसा पोहचणार? जाणून घ्या समीकरण 

भाजप पक्षातील सत्ताधारी मंडळींकडून आता सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जातोय. सरकारी कर्मचारी हे आमच्या घरचे नोकर आहेत अशा भावनेतून सरकारी कर्मचाऱ्यांना वागवलं जातंय आणि या अधिकाऱ्यांच्या मार्फत सत्ताधारी मंडळींकडून विरोधकांना त्रास दिला जातोय. यासाठी पोलीस प्रशासनाचा देखील गैरवापर केला जात असल्याचा देखील यावेळी तनपुरे म्हणाले.

दरम्यान, राज्यभर सध्या प्रशासनाकडून अतिक्रमण धारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. यातच नगर जिल्हासह शहरांमध्ये देखील अनेक अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. बुऱ्हानगरमधील कारवाई देखील अतिक्रमणधारकांवरीलच आहे, असं देखील प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

follow us