पहिल्याच सामन्यात लाजिरवाणा पराभव, पाकिस्तान उपांत्य फेरीत कसा पोहचणार? जाणून घ्या समीकरण

  • Written By: Published:
पहिल्याच सामन्यात लाजिरवाणा पराभव, पाकिस्तान उपांत्य फेरीत कसा पोहचणार? जाणून घ्या समीकरण

Champions Trophy 2025:  बुधवार 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची (Champions Trophy 2025) सुरूवात झाली आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला न्यूझीलंडकडून (PakvsNZ) लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे या स्पर्धेच्या  उपांत्य फेरी गाठण्याच्या पाकिस्तानच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.

न्यूझीलंडने या सामन्यात पाकिस्तानला 60 धावांनी पराभव केला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा नेट रन रेट -1.200 झाला आहे.  आठ संघ असणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक सामना महत्वाचा असतो. ग्रुप अ मध्ये पाकिस्तानचा पुढचा सामना 23 फेब्रुवारी रोजी भारताशी (IndvsPak) आहे. कराची येथील नॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 5 गडी गमावून 320 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, पाकिस्तानचा संघ 47.2 षटकांत 260 धावांवर आटोपला.

पाकिस्तान अंतिम-4 मध्ये कसा पोहोचेल?

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या  उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी आता पाकिस्तानला दोन्ही सामने जिंकावे लागणार आहे. जर पाकिस्तानने दोन्ही सामन्यांपैकी एकही सामना गमावला तर त्यांना अंतिम 4 मध्ये पोहोचणे अशक्य आहे. तर दुसरीकडे दोन्ही सामने जिंकून देखील आता पाकिस्तानला दुसऱ्या संघाच्या नेट रनरेटवर अवलंबून राहावे लागणार आहे.  न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा नेट रन रेट निगेटिव्ह झाला आहे.

पाकिस्तान कसा पात्र ठरू शकतो?

जर पाकिस्तानने पुढील दोन सामने गमावले तर ते बाहेर पडेल.

जर पाकिस्तानने दोनपैकी एक सामना जिंकला तर त्यांना अंतिम 4 मध्ये पोहोचण्यासाठी नेट रन रेटवर अवलंबून राहावे लागेल.

जर आपण दोन्ही सामने जिंकले तर पात्रता फेरी गाठण्याची शक्यता जास्त आहे.नेट रन रेटवर अवलंबून राहावे लागेल.

चर्चा सईच्या बॉस लेडी लूकची ! ‘डब्बा कार्टेल’ मध्ये दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत 

तर दुसरीकडे न्यूझीलंडविरुद्धचा सामना गमावल्यानंतर, पाकिस्तानचा आता 23 फेब्रुवारी रोजी पुढचा सामना दुबईमध्ये भारताशी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताची आकडेवारी उत्कृष्ट आहे. त्यामुळे हा सामना पाकिस्तानला खूप अवघड असणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube