Download App

कर्डिलेंनी डोळ्यावरील काळा चष्मा काढावा, विकास दाखवतो, आ. प्राजक्त तनपुरेंचे खुले आव्हान

शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी डोळ्यावरील काळा चष्मा काढावा, मग त्यांना दाखवतो राहुरी मतदार संघाचा काय विकास केला.

  • Written By: Last Updated:

अहिल्यानगर – शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी डोळ्यावरील काळा चष्मा काढावा, मग त्यांना दाखवतो राहुरी मतदार संघाचा काय विकास केला आहे. मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली असून देखील जर त्यांना विकास दिसत नसेल तर, त्यांनी समोर यावं आणि चर्चा करावी, असे खुले आव्हान आ. प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी केलं.

चित्रपटगृहात 15 नोव्हेंबरला मनोरंजनाची चटकदार ‘पाणीपुरी’; ‘गोल्डमॅन’च्या भूमिकेत ऋषिकेश जोशी, चाहत्यांची उत्सुकता वाढली 

गुरवारी सकाळी प्रवारा पट्टा परिसरात महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जन आर्शिवाद याञे दरम्यान मतदारांशी संवाद साधला आ. तनपुरे यांनी पञकारांशी संवाद साधताना कर्डिले यांच्या टिकेला उत्तर देताना सांगितले की, कर्डिले हे देखील पंचवीस वर्ष आमदार होते, ते देखील मंत्री राहिलेले आहेत. निळवंडे धरणाच्या प्रश्नावर त्यांनी दोन वेळा निवडणुका काढल्या असून जनतेची फसवणूक केली. आम्ही मात्र पहिल्याच वेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साडेबाराशे कोटी रुपये धरणाच्या कालव्यासाठी आणले असून तो प्रश्न मार्गी लावला आहे.

धोका धर्माला नाही, आरक्षणाला; प्रकाश आंबेडकरांनी ओबीसींना दिला गंभीर इशारा 

आम्ही मतदारसंघात सहा सबस्टेशन आणि शेकडो ट्रान्सफॉर्मर बसवले, कर्डिलेंनी एक तरी ट्रान्सफार्मर बसवला का? असा सवालही तनपुरेंनी केला.

ते म्हणाले, राहुरी बस स्थानकाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे. वांबोरी चारीला पाणी आणतो अशा सातत्याने कर्डिले यांनी वल्गना केल्या होत्या, मात्र ते देखील काम आम्ही आमच्या काळात पूर्ण केले.

कर्डिलेंनी विकास खुंटवला…
नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात देखील विकास कामे केली. पाथर्डी तालुक्यात मृद जलसंधारणाच्या माध्यमातून कित्येक तलावांची कामे पूर्ण केली. नागरदेवळा भागामध्ये विकासाचे व्हिजन ठरवून ग्रामपंचायतीची नगरपालिका केली. परंतु यांच्या सरकारमध्ये यांनी पुन्हा नगरपालिकेची ग्रामपंचायत केली. केवळ यांच्या राजकारणामुळे त्यांनी त्या भागातील विकास खुंटवला, असा हल्लाबोल तनपुरेंनी केला.

आम्ही विजेची, पाण्याची त्याचबरोबर शहरी तसेच ग्रामीण भागात मूलभूत प्रश्नांची सोडवणूक केली, कर्डिलेंनी यांनी दहा वर्षात कुठलं एक विकासाचं काम केलं ते सांगावे, केवळ भाषणे करायला काय लागतं? आधी भाषण करायला शिकावं, मग आमच्यावर टीका करावी, अशी टीकाही आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे.

follow us