Download App

तुमच्या नौटंकीसाठी नागरिकांचे हाल का? तनपुरेंचा सवाल

Shasan Aaplya Dari Ahmednagr : अहमदनगर जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आज शिर्डी येथे पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मोठे मंत्री, आमदार, खासदार उपस्थित आहेत. या कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना जाण्यायेण्याची सोय म्हणून जिल्ह्यातून तब्बल 600 बसेसची सोय करण्यात आली आहे. दरम्यान महामंडळाच्या बसेस या शासनाच्या कार्यक्रमासाठी तैनात करण्यात आल्याने दुसरीकडे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बसअभावी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याच प्रश्नावरून आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

PM Vishwakarma Yojana : कारागिरांसाठी मोदी सरकारने आणले ‘अच्छे दिन’; जाणून घ्या योजना

अनेकदा पुढे ढकलण्यात आलेला व अखेर आज पार पडणारा शासनाचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रमासाठी मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. आजच्या कार्यक्रमासाठी नगर जिल्ह्यातील 30 हजारापेक्षा जास्त लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. यासाठी जिल्ह्यातून 600 बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र शासनाच्या या कार्यक्रमामुळे काही ठिकाणी वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. यातच वांबोरी या ठिकाणी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बस मिळत नसल्याने त्यांची वणवण होत असल्याचे चित्र समोर आले. यावर राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भाष्य करत शासनाच्या या नियोजनावर संताप व्यक्त केला आहे.

शानदार… जबरदस्त… भारीच…! ‘Baipan Bhari Deva’ ची बॉक्स ऑफिसवर बम्पर कमाई, कमावले ‘इतके’ कोटी

तनपुरे म्हणाले, शासनाच्या कार्यक्रमासाठी बससेवा शिर्डीकडे तैनात करण्यात आली. असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वाहन उपलब्ध नाही. तसेच याबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही कल्पना देण्यात आली आहे. ‘शासन आपल्या दारी’ या शासनाच्या अतिरंजित उपक्रमामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील लोकांचे, विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. आज सकाळी अनेक विद्यार्थी शाळा, कॉलेजमध्ये जाण्यासाठी पायपीट करताना दिसले. कारण सर्व एसटी बसेस मुख्यमंत्री महोदयांच्या सेवेसाठी तैनात आहेत. यांच्याकडून कार्यक्रमासाठी गर्दी जमेना म्हणून खूप दुरून लोकं आणावी लागत आहेत, असे ऐकले. अशा शब्दांत आमदार तनपुरे यांनी टीका केली.

तसेच शासनाच्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थी परीक्षांसाठी पोहचू शकले नाही. गेल्या अनेक तासांपासून ते बसची वाट पाहत असल्याचे मी पहिले. अनेकांना तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त जायचे असते मात्र बसअभावी त्यांची गैरसोय झाली. शासन आपल्या दारी की लोक शासनाच्या दारी. हा विचार करायला पाहिजे. विद्यार्थ्यांची गैरसोय करत शासनाने भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी बसेसची सोय केली. तुम्हाला जायचं तर तुम्ही स्वतःच्या वाहनाने जा. तुम्ही गुवाहाटीला कसे गेले होते. शो बाजी करण्यासाठी स्टंट करण्यासाठी. जाहिरातीसाठी तसेच दिखाव्यासाठी हा कार्यक्रम केला जातो आहे. मात्र तुमच्या या नौटंकीसाठी सर्वसामान्य नागरिकांचे हाल कशासाठी करतायत असा संतप्त सवाल यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सरकारला केला आहे.

Tags

follow us