कोपरगावमध्ये काळे-कोल्हेंमध्येच लढत ! काका कोयटे राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार

Kaka Koyte महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व समता उद्योग समूहाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.

President of Maharashtra State Cooperative Credit Union Federation Kaka Koyte join ncp

President of Maharashtra State Cooperative Credit Union Federation Kaka Koyte join ncp

Kaka Koyte join ncp : कोपरगाव (Kopergaon) नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुती संपुष्टात आली आहे. कारण भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाने स्वतंत्र्य निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे ( MLA Ashutosh Kale) यांनी मास्टरस्ट्रोक खेळलाय. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व समता उद्योग समूहाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे (Kaka Koyte) यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारीही जाहीर झालीय.


Ahilyanagar Election Observers : अहिल्यानगर जिल्ह्यात चार निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व समता उद्योग समूहाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी कोपरगाव शहराच्या विकासासाठी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थित हा प्रवेश झालाय. तसेच कोल्हे गटाचे माजी नगरसेवक जनार्दन कदम राष्ट्रवादीत सामील झाले आहेत. माजी नगरसेवक जनार्दनजी कदम यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित होते. काका कोयटे हे मंत्री राधाकृष्ण विखे यांचे समर्थक मानले जातात. त्यांनाच राष्ट्रवादीत घेऊन आमदार काळे यांनी मोठी खेळी केलीय.


आगामी निवडणुकांसाठी भाजप पाठोपाठ अजितदादांचे 40 शिलेदारही मैदानात

(President of Maharashtra State Cooperative Credit Union Federation Kaka Koyte join ncp)

कोपरगावमध्ये महायुती संपुष्टात

विधानसभा निवडणुकीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला सुटली होती. कोल्हे यांनी महायुतीचा धर्म पाळत आशुतोष काळे यांना मदत केली होती. परंतु कोपरगाव नगरपालिकेमध्ये मात्र महायुती होऊ शकलेली नाही. काल भाजप मित्रपक्ष अर्थात कोल्हे गटाकडून सर्व उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. भाजप पक्षाकडून नाहीतर स्थानिक आघाडी कोल्हे यांनी जाहीर केलीय.


कोल्हेंकडून पराग संधान नगराध्यक्षपदाचे उमेदवार

कोल्हे गटाकडून पराग संधान यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. पराग संधान हे मराठा कुणबी आहेत. तर काका कोयटे हे ओबीसी उमेदवार आहेत.

Exit mobile version