Download App

Ahmednagar News : जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू; ‘या’ नियमांचं पालन करावं लागणार

  • Written By: Last Updated:

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हयात (Ahmednagar News ) सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल सीमेच्या हद्दीत 14 सप्‍टेंबर, 2023 रोजीच्या रात्री 12-00 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

Yaariyan 2 सिनेमा वादाच्या भवऱ्यात; निर्मात्यांसह कलाकारांविरोधात तक्रार दाखल

पुढील कृत्ये करण्यास मनाई…

या आदेशानुसार अहमदनगर जिल्हयात (Ahmednagar News ) नमूद कालावधीत कोणालाही पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे.शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्‍य करणे.

कॅनरा बँकेची 538 कोटी रुपयांची फसवणूक; जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक

आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव आणणे अगर तशी चित्रे, चिन्‍हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे. सार्वजनिक तसेच खासगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्‍य कारणास्‍तव सभा घेण्‍यास, मिरवणुका काढण्‍यास व पाचपेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकत्र येण्‍यास मनाई करण्यात आली आहे.

शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, तसेच ज्या व्यक्तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव काठी वापरणे आवश्यक आहे. प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, लग्‍नसमारंभ, लग्‍नाच्‍या मिरवणुका, सभा घेण्‍यास अथवा मिरवणुका काढण्‍यास ज्‍यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहायक पोलीस निरीक्षक यांची रितसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना सदरचा वापर अनुज्ञेय राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे

Tags

follow us