Download App

Radhakrishn Vikhe : आठ दिवसात शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करा, अन्यथा…

  • Written By: Last Updated:

Radhakrishn Vikhe On Action : अहमदनगर शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्यात, संबंधित प्रशासनाना पुढच्या आठ दिवसांनी वेळ दिल्याचे त्यांनी सांगितलं. आठ दिवसात शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे सांगितले असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले.

वैयक्तिक वादाला जातीय रंग देण्याचे काम काही संघटना आणि काही लोक करत असल्याचेही विखे म्हणाले, याबाबत संबधीताना कारवाई करण्याचा सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. अचानक अशा घटना का वाढल्या आहेत त्याबाबत चौकशीनंतर तथ्य समोर येईल त्यानंतर काय उपाययोजना करायच्या ते ठरवता येईल असंही ते म्हणाले.

विरोधकांकडून सातत्याने सरकार पडणार असं बोललं जातंय, मात्र हे सत्ता गेल्याने आलेल्या वैफल्यातून ते बोलत आहेत त्यांनी आता प्रभावी विरोधीपक्ष म्हणून काम करण्याची गरज असल्याचे विखे म्हणाले.

राऊतांचा गौप्यस्फोट ! शरद पवार म्हणाले भाजपात जाण्यासाठी कुटुंबियांवर दबाव

वज्रमूठ सभेवर विखे म्हणाले… महाविकास आघाडीच्या वज्रमुठीकडे राज्यातील जनता आता लक्ष देत नाही. वज्रमुठीला आधीच तडे गेलेत अशी टीका राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीये. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेबाबत विखेंना विचारले असता त्यांची वज्रमूठ सुटत चालली आहे असं विखे म्हणाले. तर उद्धव ठाकरे यांचा रिमोट कंट्रोल हा सिल्व्हर ओकवर असल्याची टीका देखील त्यांनी केली.अहमदनगर येथील व्यापाऱ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील जखमी व्यापाऱ्यांची महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी भेट घेतली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

प्रकाश आंबेडकरांनी सांगितला योगींचा फंडा, म्हणाले, कायद्याने आळा घालता येत नसेल तर..

भाजपकडून राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं त्याबाबत बोलताना राधाकृष्ण विखेंनी संजय राऊत यांच्या वक्तव्याला एवढं महत्व देण्याची गरज नसल्याचे म्हटलं आहे, कोणी कुणाचा पक्ष फोडत नाही , ज्यांनी हिंदुत्वाचा विचार सोडून दिलाय त्यामुळे त्यांना त्याची किंमत मोजावी लागली आहे…अजूनही त्यांनी शहाणपणाने वागायला हरकत नाही असा टोला राधाकृष्ण विखेंनी लगावला…अजूनही त्यांचा भंपकपणा जात नसेल तर दुर्दैव आहे असं ते म्हणाले.

Tags

follow us