Download App

आरोप सिद्ध करा मी संन्यास घेईल, मंत्री विखेंचे राऊतांना ओपन चॅलेंज

Radhakrishna Vikhe On Sanjay Raut : महानंदाची जमीन (Mahananda land)विखे लाटत आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी केला आहे. यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe)यांनी परखड शब्दात उत्तर दिलं आहे. मंत्री विखे म्हणाले की, संजय राऊत यांच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे. त्यांना माणसोपचाराची गरज आहे. संजय राऊत यांनी केलेले आरोप त्यांनी सिद्ध करावेत, ते आरोप जर सिद्ध झाले तर राजकारणातून सन्यास घेईल, असं ओपन चॅलेंज मंत्री विखे यांनी संजय राऊतांना दिलं आहे.

मोदी सरकारविरोधात एक्सचा शड्डू! काही पोस्ट डिलीट करण्याचे आदेश; कंपनीचा सपशेल नकार

मंत्री विखे पाटील म्हणाले की, संजय राऊत जी कुठली पन्नास एकर जमीन म्हणत आहेत, ते जे काही आरोप करत आहेत, त्यांच्याविरोधात आपण अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असं विखे यांनी म्हटलं आहे. आत्तापर्यंत आपण अनेकदा पथ्य पाळले मात्र समोरील व्यक्ती जर आपली बदनामी करत असेल त्याचे परिणाम देखील त्यांनी भोगण्याची तयारी ठेवावी, असा थेट इशाराही मंत्री विखे यांनी संजय राऊत यांना दिला.

तुकाराम महाराजांची सपशेल माफी अन् बारस्करांवर आरोप : CM शिंदेंचा प्रवक्ता पाठिंबा देत असल्याचा जरांगेंचा दावा

यापुढे संजय राऊत यांनी त्यांच्या व्यक्तीगत जीवनात जे काही उद्योग केले आहेत? कोणाची घरं फोडली? कोणाची घरं उध्वस्त केली? आता त्याची नावं मला सांगावी लागतील. असंही यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले.

50 एकर जमिनीचा दावा काय करता? तुम्ही ते सिद्ध करा, आपण राजकीय सन्यास घेऊन टाकतो, असेही यावेळी सांगितले. त्याचबरोबर संजय राऊत यांनी मुंबई विकण्याचा डाव सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मिळून त्यांना साथ देत आहेत. त्यावर मंत्री विखे म्हणाले की, संजय राऊतांच्या आरोपांवर भाष्य करण्याची गरज नाही. त्यांना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. ते सुपारीबहाद्दर लोक आहेत, ते सुपारी घेऊन काम करतात.

संजय राऊत हे पिसाळलेल्या कुत्र्यासारखे भुंकायचे काम करतात, पण आमच्यावर ते म्हणण्याची वेळ आणू नका, असंच आमचं म्हणणं आहे, असेही यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

follow us