श्रीरामपूरचा गड विखेंनी राखला, काँग्रेसला व्हाईटवॉश

Srirampur APMC Election results : अहमदनगर जिल्ह्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (Srirampur APMC Election) निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले आहे. त्यानंतर निकाल देखील जाहीर होत आहेत. यामध्ये श्रीरामपूर बाजार समितीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना धोबीपछाड दिला आहे. भाजपच्या 18 पैकी 17 उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला […]

Untitled Design (3)

Untitled Design (3)

Srirampur APMC Election results : अहमदनगर जिल्ह्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (Srirampur APMC Election) निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले आहे. त्यानंतर निकाल देखील जाहीर होत आहेत. यामध्ये श्रीरामपूर बाजार समितीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना धोबीपछाड दिला आहे. भाजपच्या 18 पैकी 17 उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

श्रीरामपूर बाजार समितीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे, भानुदास मुरकुटे, काँग्रेसचे करण ससाणे हे तिघे एकत्र आले होते. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे आमदार लहू कानडे, राष्ट्रवादीचे अविनाश आदिक यांचा गट होता. या यात कानडे आदिक पॅनेलचा धुव्वा उडाला आहे. या गटाला अवघी एक जागा मिळाली आहे. विखे, मुरकुटे, ससाणे या पॅनेलला 17 जागा मिळाल्या आहेत. तर यापूर्वी या बाजार समितीत विखे-ससाणे गटाची सत्ता होती.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर

राहाता बाजार समितीमध्ये देखील राधाकृष्ण विखेंनी आपला गड राखला आहे. 18 जागांपैकी 15 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. यापूर्वीच भाजपच्या 3 जागा बिनविरोध झाल्या होत्या. आता निवडणूक झालेल्या 15 जागांवर विखे पाटील यांच्या गटाच्या सर्व उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची राहाता बाजार समितीच्या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र बाळासाहेब थोरातांनी प्रतिष्ठा पणाला लावूनही राधाकृष्ण विखेंनी सत्ता राखली आहे.

Exit mobile version