Download App

शरद पवारांनी नगर जिल्ह्याचे वाटोळं केलं, राधाकृष्ण विखेंची सडकून टीका

पद्मश्रींच्या पुढच्या पिढीने काय केले? हे सांगण्यासाठी आज स्व. आप्पासाहेब पवार हयात असायला हवे होते. पवारांना आता विस्मरण होऊ लागले आहे - विखे

Radhakrishna Vikhe Patil on Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha elections) प्रचार जोरात सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी एक सभेत बोलतांना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर सडकून टीका केली. विठ्ठलराव विखे (Vitthalrao Vikhe) पाटील यांच्या नंतरच्या पिढ्यांनी काय केले, अशी टीका पवारांनी केली होती. त्याला आता मंत्री विखेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

फसव्या प्रवृत्तीला खड्यासारखं बाजूला करा; शरद पवारांची मतदारांना साद 

पद्मश्रींच्या पुढच्या पिढीने काय केले? हे सांगण्यासाठी आज स्व. आप्पासाहेब पवार हयात असायला हवे होते. पवारांना आता विस्मरण होऊ लागले आहे, यामुळं त्यांच्याशी खुली चर्चा करण्याची आपली केव्हाही तयारी आहे. पवारांनी नगर जिल्ह्याचे कसं वाटोळं केलं, हे त्यांना दाखवून देऊ, असं आव्हान विखे पाटलांनी केलं.

भारताला धक्का देत इंग्लंडच्या माजी कर्णधाराने T20 World Cup 2024 च्या उपांत्य फेरीसाठी निवडले ‘हे’ संघ 

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. पवारांनी केलेल्या टीकेविषयी विचारलं असते ते म्हणाले, बाळासाहेब विखे पाटील यांनी 8 वेळा संसदेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला सात वेळा आमदार म्हणून निवडून दिले. पद्मश्रींनी दिलेल्या विचारांचे हे यश आहे. विखे कुटुंब त्यांचेच संस्कार घेऊन पुढं जात आहे. आमच्या कुटुंबाने सार्वजनिक जीवनातील प्रत्येक संधीचा उपयोग जिल्ह्याच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी केल्याचं विखे म्हणाले.

पुढं बोलतांना ते म्हणाले, जिल्ह्याच्या विकास कामात ज्यांनी नेहमीच अडथळे निर्माण केले, ज्यांना जिल्ह्यातील विकासाची प्रक्रिया ज्यांना देखवत नाही, त्यांच्याशी जिल्ह्याच्या विकासाबाबत खुली चर्चा करण्यास आम्ही सदैव तयार आहोत, असं आव्हान विखेंनी केलं. विखे पाटील म्हणाले, या चर्चेत शरद पवारांनी जिल्ह्याचे कसे नुकसान केले ते आम्ही त्यांना पटवून देऊ. पवारांमुळे जिल्ह्यातील पाणी गेले, शेतकरी अडचणीत आला, जिल्ह्यात एकही प्रकल्प आणला नाही. त्यांचे जिल्ह्यासाठी काय योगदान आहे? असा सवाल विखेंनी केला.

पद्मश्रींच्या पुढच्या पिढीने काय केले? हे सांगण्यासाठी आज स्व. आप्पासाहेब पवार हयात असायला हवे होते. याचे उत्तर त्यांनी नक्की दिले असते, असं विखे म्हणाले.

follow us