Download App

“वाळू धोरणात कसूर नाही, अधिकाऱ्यांवर कारवाई सुद्धा केली”, मंत्री विखेंची सारवासारव

प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेऊ नका. काही गोष्टी आपण गंमतीने बोलतो. मात्र, वाळूच्या धोरणाबाबत आम्ही अतिशय कठोर राहिलो आहोत.

Radhakrishna Vikhe Patil : राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूरातील एका कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी आपल्या भाषणातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना एकप्रकारे अभय दिल्याची टीका सुरू झाली होती. विरोधकांनीही टीकेची झोड उठवली. यानंतर अखेर मंत्री विखे पाटील यांनी वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. सर्वच गोष्टी गांभीर्याने घेऊ नका. काही गोष्टी आपण गंमतीने बोलतो असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

भंडारदरा धरणातून चार आवर्तने सोडण्यात येणार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय

काय म्हणाले होते विखे पाटील?

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोलापूर येथील भाषणात म्हटले होते की, तुमच्या जिल्ह्यात वाळू आणि क्रशरच्या गाड्या भरपूर, यावरुन बरंच ऐकावं लागतं. सगळी आपलीच माणसं असल्याने मी मागे जिल्हाधिकाऱ्यांना दुर्लक्ष करण्यास सांगितलं होतं. तुमच्या जिल्ह्यात वाळू आणि क्रेशरच्या च्या भरपूर गाड्या चालतात असे सांगत जयकुमार तुम्हाला याकडे लक्ष द्यावे लागेल असे सांगितले. मी पालकमंत्री असताना अनेक वेळेला याबाबत तक्रारी व्हायच्या, पण मी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना याकडे दुर्लक्ष करण्याचे सांगितले होते. कारण हे घेऊन जाणारे सगळे आपलेच लोक आहेत, असे सांगत वाळू आणि खडीच्या गाड्यांना अभय द्या ,असे सूचक वक्तव्य भाषणात विखे पाटील यांनी केले होते.

विखे पाटलांनी काय स्पष्टीकरण दिलं?

तुम्ही प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेऊ नका. काही गोष्टी आपण गंमतीने बोलतो. मात्र, वाळूच्या धोरणाबाबत आम्ही अतिशय कठोर राहिलो आहोत. धोरणाची अंमलबजावणी करताना कुठेही कसूर केलेली नाही. प्रसंगी अधिकाऱ्यांवर कारवाई सुद्धा केली. नदीतून वाळू काढण्याला माझा कायमच विरोध राहिला आहे असे स्पष्टीकरण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वाळू उपसा करणाऱ्यांना अभय; म्हणाले, ही सगळी आपलीच 

दरम्यान, सध्या सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांनी थैमान घातला असून चंद्रभागेच्या वाळवंटाची दैनावस्था झाली आहे. अशावेळी विखे पाटील यांचे वक्तव्य भाजपला अडचणीत आणणारे ठरू शकले असते. जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याने वाळू माफिया आणि सत्ताधाऱ्यांमध्ये हितसंबंध असल्याचे गुपित उघड झाल्याची चर्चाही सुरू झाली होती. या संभाव्य संकटाची जाणीव झाल्याने मंत्री विखे पाटील यांनी या वक्तव्यावर तत्काळ स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

follow us