Download App

विखेंच्या पाठपुराव्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जन्मगावातील शाळेस दोन कोटींचा निधी मंजूर

Ahmedngar News : सराकारने सन २०२२-२३ च्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात वित्त विभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील महापुरुष यांच्याशी सबंधित दहा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथील जिल्हा परिषद शाळेला दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ( Radhakrishna Vikhe Patil Follow up Funding Approve for Punyashlok Ahilyabai Holkars Birthplace Chaudi ZP School )

बीडच्या अविनाश साबळेची दिमाखदार कामगिरी; Olympic 2024 साठी पुन्हा निवड

या निधीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठपुरावा केला होता. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे मुख्य अभियंता यांनी या संदर्भात शासनाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला होता, यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यांच्या या मागणीनुसार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चौंडी या ऐतिहासिक गावातील शाळा आता विकसित होणार आहे. वित्त विभागाने दोन कोटी तीन लाख त्रेचाळीस हजार पंचवीस रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

Maharashtra assembly session : पहिल्याच दिवशी बच्चू कडूंची हवा: मंत्रिपदाचा शब्द अन् CM शिंदेंसोबत रॉयल एन्ट्री

त्यामुळे आता जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथील जिल्हा परिषद शाळेचा विकास होणार आहे. या गावामध्ये ऐतिहासिक वारशासह आता शालेय शिक्षणाकडे देखील लक्ष दिले जावे शैक्षणिक दृष्ट्या विकास होणे गरजेचे असल्याची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून होत आहे.

Tags

follow us