बीडच्या अविनाश साबळेची दिमाखदार कामगिरी; Olympic 2024 साठी पुन्हा निवड
Runner Avinash Sable Selected for 2024 Olympics: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील लांब पल्ल्याचा धावपटू अविनाश साबळे याची 2024 साली पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये चमकदार कामगिरी करत अविनाश साबळेने आपले नाव ऑलिम्पिकसाठी कन्फर्म केले आहे.
अविनाश साबळेने रविवारी पोलंडमध्ये खेळवण्यात आलेल्या सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत 8. 11. 63 वेळ नोंदवून सहावं स्थान पटकावलं आहे. आपलं नाव सहाव्या स्थानी नोंदवत अविनाश साबळे 2024 मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. त्यानं आठ सेकांदात 11.63 सेकंदामध्ये पुरुषांच्या 3 हजार मीटर स्टीफलचेस स्पर्धेत अंतर गाठलं आहे. त्यामुळेच त्याला दुसऱ्यांदा ऑलिम्पिकची संधी मिळाली आहे.
बांगलादेशसमोर भारतीय फलंदाजांचे लोटांगण, 40 धावांनी पराभव
बीड जिल्ह्यातल्या मांडवा गावातील अविनाश साबळे याने टोकियो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये (Commonwealth Games 2022) देखील चांगली कामगिरी केली होती. रयाबीत डायमंड लीग स्पर्धेत त्याने 300 मीटर अडथळ्यांचा शर्यतीत 8:12:48 सेकंदाची वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम केला होता, तर अविनाशनं आत्तापर्यंत 9 वेळा स्वतःचाच रेकॉर्ड मोडला आहे. दुसऱ्यांदा अविनाश साबळे याची ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाल्यानं सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार? ‘या’ पक्षाकडून लढणार लोकसभा निवडणूक
Steeplechaser Avinash Sable qualifies for 2024 Paris Olympics after finishing 6th in Diamond League. #Athletics
— Press Trust of India (@PTI_News) July 16, 2023
अविनाश पहिली ते पाचवीपर्यंत गावातील जिल्हा परिषद शाळेमध्येच शिकला. त्याची घरची परिस्थिती हलाखीची होती. त्याचे आई-वडील वीटभट्टीवर काम करायचे. त्या कामात अविनाश त्यांना मदत करायचा. शाळेत जाताना आणि येताना तो धावण्याचा सराव करायचा. मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी आणि सरावासाठी वेळप्रसंगी व्याजाने पैसे काढले आणि त्याचे शिक्षण व सराव चालू ठेवला. लष्करामध्ये अविनाशला नोकरी लागली तरी त्याच्यामधील खेळाडू शांत बसला नाही. आता दुसऱ्यांदा तो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.