बांगलादेशसमोर भारतीय फलंदाजांचे लोटांगण, 40 धावांनी पराभव

बांगलादेशसमोर भारतीय फलंदाजांचे लोटांगण, 40 धावांनी पराभव

INDW vs BANW: महिला क्रिकेटमध्ये शेरे ए बांगला क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिकेतील पहिला सामना झाला. या सामन्यात भारताला 40 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पावसामुळे हमरनप्रीत कौरच्या संघाला डकवर्थ लुईस नियमाने लक्ष्य दिले होते. पण टीम इंडिया 113 धावांवर गडगडली.

नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसाने खेळ थांबवला तेव्हा बांगलादेशच्या 16 व्या षटकात 2 बाद 40 धावा झाल्या होत्या. पावसानंतर सामना पुन्हा सुरू झाला तेव्हा 44-44 षटकांचा खेळवण्याचा निर्णय झाला. बांगलादेशचा संघ अवघ्या 152 धावांत ऑलआऊट झाला. हा सामना जिंकण्यासाठी भारतासमोर 153 धावांचे आव्हान होते.

बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाने 39 धावांची खेळी केली. यादरम्यान भारताकडून अमनजोत कौरने 4 बळी घेतले. तिने 9 षटकात 31 धावा दिल्या. देविका वैद्यने 7 षटकांत 36 धावा देत 2 बळी घेतले. दीप्ती शर्मालाही यश मिळाले. पूजा वस्त्राकर, स्नेह राणा आणि अनुषा यांना एकही विकेट मिळाली नाही.

Duleep Trophy 2023; हनुमा विहारीच्या संघाने पटकावले दुलीप करंडकचे विजेतेपद

भारतीय महिला संघाने फलंदाजीची सलामी दिली आणि 23 षटकात अवघ्या 75 धावांत 5 विकेट गमावल्या. भारताला विजयासाठी अजुन 78 धावांची गरज होती पण बांगलादेश संघाने सामन्यात पुनरागमन केले. भारताकडून दीप्तीने सर्वाधिक 20 धावा केल्या. देविका वैद्यने एका चौकाराच्या मदतीने 10 धावा केल्यानंतर नाबाद राहिली. सलामीवीर प्रिया पुनिया 10 धावा करून परतली.

दिशा पटनीचा बोल्ड अंदाज, फोटो झाले व्हायरल

स्मृती मानधना 11 धावा करून बाद झाली. युस्तिका भाटिया 15 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. कर्णधार हरमनप्रीतला केवळ 5 धावा करता आल्या. जेमिमा रॉड्रिग्जलाही विशेष काही करता आले नाही. ती 10 धावा करून बाद झाली. भारतीय संघ 35.5 षटकात 113 धावांवर ऑलआऊट झाला आणि बांगलादेशने 40 धावांनी सामना जिंकला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube