Radhakrishna Vikhe : बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादववर (Elvish Yadav) रेव्ह पार्ट्या आयोजित करण्याबरोबरच नशेसाठी विषारी सापांचे विषाचा वापराबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसनंतर आता ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर आता राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) मुख्यमंत्र्यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील सचिन वाझे प्रकरणाची आठवण करून देत संजय राऊत यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
नगर जिल्ह्यातील लोणी येथे जनता दरबार आयोजित केला होता. त्यानंतर मंत्री विखे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात अनेक गैरव्यवहार झाले. त्यातील बरेच आरोपी कधी मातोश्रीवर तर कधी वर्षा बंगल्यावर दिसत असायचे. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाचीच माहिती मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना नसते. त्यामुळे या विषयाचे इतके भांडवल करण्याची काहीच गरज नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सचिन वाझे कुठे कुठे फिरत होते, कसे खंडणी गोळा करायचे, त्यांना कोण टार्गेट देत हते यावर राऊत गप्प का आहेत, असा सवाल विखे यांनी केला.
Elvish Yadav : ‘हे ‘उबाठा’च्या वैफल्यग्रस्त लोकांचे धंदे’; फडणवीसांचा हल्लाबोल
‘मविआ’च्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षण गेले
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही विखे यांनी भाष्य केले. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी सर्वांचीच भावना आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण देण्यात आले होते. मात्र, पुढे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हलगर्जीपणामुळेच आरक्षण गेले अशी टीका मंत्री विखे पाटील यांनी केली.
हे ‘उबाठा’च्या वैफल्यग्रस्त लोकांचे धंदे – फडणवीस
मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा गणेशोत्सव असतो त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे सेलेब्रिटी मंडळी येत असतात. आता त्यावेळी एल्विश यादव हा रियालिटी शो जिंकलेला होता त्यावेळी तो सेलिब्रिटी होता. असे अनेक सेलिब्रिटी त्या ठिकाणी येऊन जातात. ज्यावेळेस तो येऊन गेला त्यावेळेस त्याच्यावर कोणताही आरोप झालेला नव्हता. तो त्यावेळी एक सेलिब्रिटी म्हणून येऊन गेला होता. आता त्याच्यावर आरोप आहेत त्याचा जर हिशोब करायला लागलो तर मग राज्यातल्या अनेक पुढाऱ्यांना अडचणी होतील. काही वाटलं की करा मुख्यमंत्र्यांवर आरोप हे जे काही धंदे चाललेले आहेत. हे जे वैफल्यग्रस्त उबाठाचे लोकं आहेत हे अशा प्रकारचे धंदे करतात, अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरे गटावर पलटवार केला.
Maratha Reservation : कुणबी नोंदी राज्यभर शोधणार, सरकार अॅक्शन मोडवर