Sujay Vikhe : एकमेकांचं कॉपी नको, नवं काहीतरी करू… देवदर्शनावरून विखेंचा लंकेंना टोला

Sujay Vikhe : एकमेकांचं कॉपी नको, नवं काहीतरी करू… देवदर्शनावरून विखेंचा लंकेंना टोला

Sujay Vikhe : खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय मोर्चेबंधणी सुरु असताना नाव न घेता आमदार निलेश लंकेंना शाब्दिक टोला लगावला. त्याचं झालं असं की, राज्यात सध्या शारदीय नवरात्रोत्सव सुरु आहे. यातच लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय मोर्चेबंधणी सुरु आहे. नवरात्रीनिमित्त आमदार निलेश लंके यांच्याकडून महिलांना मोफत मोहटादेवीचे दर्शन घडविले जात आहे. यावरून आता खासदार सुजय विखे यांनी लंकेंवर शाब्दिक निशाणा साधला आहे. देवदर्शनासारखं एकमेकांचं कॉपी करण्यापेक्षा आपण काहीतरी नाविन्यपूर्ण करू अशा शब्दांत खासदार विखेंनी नाव न घेता आमदार निलेश लंकेंना शाब्दिक टोला लगावला.

मोदींना अडचणीत आणणारे प्रश्न विचारणाऱ्या महुआ मोईत्रा वादाच्या भोवऱ्यात का? नेमकं प्रकरण काय?

राज्यात सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे अहमदनगर जिल्ह्यातील मोहोटा देवी गडावर भाविकांची मोठी गर्दी आहे. आज खासदार सुजय विखे यांनी मोहोटा देवी गडावर हेलिकॉप्टर द्वारे पुष्पदृष्टी केली. या वेळी भाजपच्या आमदार मोनिका राजळे उपस्थित होत्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले, मोहटा देवीच्या गडावर काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची भाविकांची इच्छा होती. काही जणांची तक्रार होती की काही कार्यक्रम कॉफी होत आहे म्हणून हे नवीन केले मोहटा देवीवर आमची नेहमी श्रध्दा आहे अस यावेळी विखे म्हणाले.

लंकेंना शह देण्यासाठी विखेंचा प्लॅन

सध्या शारदीय नवरात्रोत्सव सुरु आहे यामुळे ठिकठकाणी नेतेमंडळींकडून भाविकांसाठी देवदर्शनाच्या वाऱ्या घडविल्या जात आहे. यातच राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्याकडून महिलांना मोफत मोहटादेवीचे दर्शन घडविले जात आहे. दरम्यान लंकेंना शह देण्यासाठी आज खासदार सुजय विखे हे सुद्धा आज मोहटादेवीला दर्शनासाठी आले होते. या देवदर्शनाच्या माध्यमातून विखे देखील आगामी लोकसभेच्या दृष्टीने मोठी शक्तिप्रदर्शनाची तयारी करू लागल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे.

Kangana Ranaut: कंगना झाली आत्या! बाळाला जवळ घेत म्हणाली, ‘आमच्या कुटुंबाला…’

येत्या काळात लोकसभा निवडणुका होणार असून त्या दृष्टीने आता राजकीय पक्ष व तसेच इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. यातच सध्या सुरू असलेला शारदीय नवरात्रोत्सव हे राजकीय मंडळींसाठी शक्तिप्रदर्शनाची मोठी संधी घेऊन आले आहे. भाविकांना देवदर्शनाच्या माध्यमातून आगामी लोकसभेची तयारी राजकीय मंडळींकडून सुरू आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube