Rahata Bazar Committee Election Results : अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीच्या 18 जागांपैकी 15 जागांसाठी निवडणूक पार पडली. तर यापूर्वीच भाजपच्या 3 जागा बिनविरोध झाल्या होत्या. आता उर्वरीत निकाल समोर आला असून सर्वच जागांवर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे.
या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाचा धुव्वा उडाला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची राहाता बाजार समितीच्या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती.
सध्या राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यातच नगर जिल्ह्यातील थोरात – विखे यांच्यासाठी प्रतिष्ठेची असलेली राहाता बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे.
राहाता बाजार समितीच्या 18 जागांपैकी 15 जागांसाठी निवडणूक पार पडली. तर यापूर्वीच भाजपच्या 3 जागा बिनविरोध झाल्या होत्या. आता उर्वरीत निकाल समोर आला असून सर्वच जागांवर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे.
थोरात गटाचा धुव्वा
राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात या दोन्ही दिग्गज नेत्यांची या राहाता बाजार समितीच्या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, या निवडणुकीत थोरांतांना मोठा धक्का बसला आहे. तर राधाकृष्ण विखे पाटलांनी राहातामध्ये एक हाती सत्ता मिळवली आहे.