Download App

राहुरीतील नव्या बसस्थानकाच्या कामाचा लवकरच श्रीगणेशा…आमदार तनपुरेंचा पाठपुरावा

Mla Prajakta Tanpure : राहुरी शहरातील बस स्थानकाची दुरावस्था झाली असल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. मात्र या बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे, यासाठी राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे(Prajakt Tanpure) यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. नुकतेच तनपुरे यांनी या बसस्थानकाच्या नवीन इमारती संदर्भात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या उप महाव्यवस्थापिका (स्थापत्य) विद्या भिलारकर व वास्तू शास्त्रज्ञ निलेश लहीवाल यांच्याशी चर्चा केली.


बस स्थानकाच्या इमारतीच्या कामकाजासंदर्भात पुढच्या आठवड्यात टेंडर प्रक्रिया सुरू करण्याचे अधिकाऱ्यांनी आश्वासित केले. अथक प्रयत्नाअंती लवकरच सुसज्ज बस स्थानकाचे काम सुरू होईल, अशी यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली.

‘प्रकाश आंबेडकरांकडून काँग्रेसला प्रस्तावच नाही’; काँग्रेस खासदाराने खरं सांगूनच टाकलं

तनपुरे नेमकं काय म्हणाले?
राहुरी शहरातील बस स्थानकाच्या नवीन इमारतीसाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. आज पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या उप महाव्यवस्थापिका (स्थापत्य) विद्या भिलारकर व वास्तू शास्त्रज्ञ निलेश लहीवाल यांच्याशी चर्चा केली.

“शासकीय रुग्णालये म्हणजे गोरगरिबांचे कत्तलखाने” : जितेंद्र आव्हाडांचा शिंदे सरकरावर हल्लाबोल

बस स्थानकाच्या नवीन इमारतीचे डिझाईन तयार झाले आहे. सुमारे पाच कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाची मान्यता अंतिम टप्प्यात आहे. उप महाव्यवस्थापिका भिलारकर यांनी माझ्या समक्ष संबंधित अधिकाऱ्यांना जलद गतीने प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. पुढच्या आठवड्यात टेंडर प्रक्रिया सुरू करण्याचे त्यांनी आश्र्वासित केले. अथक प्रयत्नाअंती लवकरच सुसज्ज अशा बस स्थानकाचे काम सुरू होईल अशी आशा आहे.

दरम्यान नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर राहुरी बसस्थानक आहे. शिर्डी व शिंगणापूर देवस्थानांच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने भाविकांची मोठी गर्दी असते. कर्नाटक, मध्यप्रदेशातून येणाऱ्या बसेसही या स्थानकात थांबतात. दिवसभरात हजारो प्रवासी बसस्थानकावरून प्रवास करतात. राहुरी बसस्थानकाची इमारत ५० वर्षांपूर्वीची जुनी, जीर्ण झालेली आहे. बसस्थानकाची दुरवस्था झाल्याने नवीन अद्ययावत इमारतीची गरज होती. यासंबंधी आमदार तनपुरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

Tags

follow us