Download App

पक्ष वाढवणाऱ्यांवर अशी वेळ म्हणजे दुर्दैव, काँग्रेसने गांभीर्याने विचार करण्याची गरज चव्हाणांच्या राजीनाम्यावर शिंदेची प्रतिक्रिया

  • Written By: Last Updated:

Ram Shinde : अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी काँग्रेसच्या सदस्य पदाच राजीनामा दिला. त्यावर भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, काँग्रेसने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यांचे वडील मुख्यमंत्री होते. ते स्वतः मुख्यमंत्री होते. अशा तीन पिढ्या ज्यांनी पक्ष वाढवला घडवला. त्यांच्यावर अशी वेळ येत असेल यासारख दुर्दैव नाही.

Sonakshi Sinha : दंबग गर्ल सोनाक्षी सिन्हाचा क्लासी लूक, चाहते घायाळ

राज्यामध्ये गेले अनेक दिवसापासून याची चर्चा होती आज अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्य पदाच राजीनामा दिला आहे यावर बोलताना भाजपचे आमदार राम शिंदे म्हणाले काँग्रेसने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे त्यांचे वडील मुख्यमंत्री होते ते स्वतः मुख्यमंत्री होते अशा तीन पिढ्या ज्यांनी पक्ष वाढवला घडवला त्यांच्यावर अशी वेळ येत असेल यासारख दुर्दैव नाही असे यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले.

अशोक चव्हाण पाडणार काँग्रेसला मोठं खिंडार; साथ देणाऱ्या दिग्गज नेत्यांचा राजीनामा तयार

तसेच पुढे बोलताना शिंदे म्हणाले, अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार याच्या चर्चा राज्यात अनेक दिवसापासून होत होती परंतु आज त्यांनी राजीनामा देऊन ती प्रत्यक्षात आणली आहे आईन निवडणुकीच्या तोंडावर जर असा निर्णय होत असेल तर काँग्रेसने यावर चिंतन करण्याची गरज आहे कोणत्याही राजकीय पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यावरती अशी वेळ न ही बाब अतिशय गंभीर आहे त्यांनी राजीनामा दिला आहे मात्र त्यांच्या मनात काय आहे हे तेच सांगू शकतात त्यांच्यापुढे आता सर्वच पर्याय खुले आहेत असेही राम शिंदे म्हणाले.

अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम!

राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. (Maharashtra Politics) तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघात झालेल्या चर्चेची माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही. मात्र, या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

follow us