Ram Shinde : अहमदनगरमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राम शिंदे ( Ram Shinde ) आणि निलेश लंके दोघेही इच्छुक उमेदवार आहे. खासदार सुजय विखे यांच्यावर कुरघुडी करण्याची एकही संधी हे दोघे कधीही सोडत नाही. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. लंकेंच्या प्रतिष्ठानतर्फे नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या महानाट्यास हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी यंदा कोणतीही तडजोड होणार नाही. असं म्हणत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्टच बोलून दाखवलं.
‘युती अजून नाही, बैठकांना जाऊ नका’; प्रकाश आंबेडकरांचा कार्यकर्त्यांना खास मेसेज
निलेश लंके प्रतिष्ठानतर्फे नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या महानाट्यास हजेरी लावली. आमदार निलेश लंके यांनी शिंदे यांना आवर्जून निमंत्रण दिले राम शिंदे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले भाजपाची लोकसभेची इतर राज्यातील यादी जाहीर झाली आहे. मात्र महाराष्ट्रातील यादी उशीर जाहीर होईल कारण महाविकास आघाडीची जागा वाटप झाल्यानंतरच भाजपाकडून उमेदवारी जाहीर होईल. तसेच निवडून येणाऱ्या उमेदवाराला भाजपकडून तिकीट मिळाले यंदा कोणतीही तडजोड होणार नाही असेही आमदार राम शिंदे म्हणाले.
‘निलेश लंकेंनी कानात काय सांगितलं?’ ‘गुगली’ प्रश्नावर रामभाऊंचं ‘सेफ’ उत्तर
महाराष्ट्रातील यादीत धक्कातंत्र ?
भाजपाच्या संभाव्य यादीत महाराष्ट्रात काही धक्कतंत्र पहायला मिळेल का, असे विचारले असता शिंदे म्हणाले, आपण पाहिलं असेल की अनेक नावं बदलली आहेत. लोकांच्या भावनांचा विचार आणि निवडून येणारा उमेदवारच भाजप देत असतो यात काहीच तडजोड होत नाही आणि त्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. 195 उमेदवारांची पहिली यादी आली आहे. अजून महाराष्ट्रातली यादी आलेली नाही. उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता हाच मुद्दा विचारात घेतला जाईल आणि त्यालाच तिकीट मिळेल. हीच भारतीय जनता पार्टीची रणनीती होती आणि राहिल. तसेच नवीन चेहरेही दिसतील, असे सूचक वक्तव्य आमदार राम शिंदे यांनी यावेळी केले.