Ram Shinde Vs Rohit Pawar : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आमदार राम शिंदे यांच्या एकरी भाषेत उल्लेख केला. तसेच तुझ्याकडे बघतोच, असे विधान केले होते. हे सर्व मुंबईतील हिवाळी अधिवेशना दरम्यान घडले आहे. परंतु याचे पडसाद आता थेट मतदारसंघात पडू लागले आहेत. आमदार राम शिंदे यांचे कार्यकर्ते चिडले आहेत. त्यांनी रोहित पवारांच्या विधानाचा निषेध केला आहे. भाजपच्या कर्जत येथील कार्यकर्त्यांनी निषेध करत रोहित पवार यांच्यावर कारवाई करण्यात, यावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.
लाखो भारतीयांचे जीव वाचणार; लष्कराला मिळाले अपघात नियंत्रण प्रणालीचे पेटंट
आमदार रोहित पवार हे आपल्या मतदारसंघातील एमआयडीसीच्या प्रलंबित मागणीसाठी विधानभवनाच्या परिसरात महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळील पायऱ्यांवर आंदोलनाला बसले होते. याच दरम्यान पवार यांनी आ. राम शिंदे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत तुझ्याकडे बघून घेतो अशी भाषा वापरून प्रसिध्दीच्या हव्यासापोटी आपल्या घराण्याला व संस्काराला न शोभणारे वक्तव्य केले केल्याची टीकाही भाजपने केली आहे.
पायाभूत सुविधांचे तीन-तेरा! 6 तास ट्राफिकमध्ये अडकल्यानंतर तांबेनी लोकलने गाठलं विधिमंडळ
तर या प्रकरणाचा निषेध करत भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांसह कर्जत येथील बाजारतळ कार्यालयापासून निषेध मोर्चा काढत कर्जत पोलीस स्टेशनला निवेदन दिले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ यांनी निवेदन स्वीकारले. कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली आहे.
या आंदोलनामध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, सहकार बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांनी आपल्या भावना व्यक्त केला. यावेळी भाजप नेते अशोक खेडकर, दादा सोनमाळी, अल्लाउद्दीन काझी, सुनील यादव, अभय पाटील, काकासाहेब धांडे, मंगेश पाटील, राहुल निंबोरे, दत्तात्रय शिपकुले, शरद म्हेत्रे, अनिल गदादे, काका ढेरे, प्रियेश सरोदे, यश बोरा, वाल्मीक साबळे, धनू आगम, जोगबापू बजंगेदी उपस्थित होते.