Download App

‘दादा’ हात जोडतो पाणी सोडा, कुकडीच्या पाण्यासाठी राम शिंदेंचे चंद्रकांत पाटलांना साकडे

Kukdi Dam water : कुकडीच्या उन्हाळी आवर्तनावरुन कर्जत-जामखेडचे राजकारण तापले आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील 22 मे रोजी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता पण अजूनही पाणी सोडण्यात आले नव्हते. यावरुन आमदार राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका करत कुकडीचे आवर्तन तात्काळ सोडण्यात यावे यासाठी चंद्रकांत पाटील यांना फोन करुन पाणी सोडण्याचे विनंती केली.

राम शिंदे म्हणाले की, दादा आपण 9 तारखेला कालवा सल्लागार समितीची बैठक घेतली होती. त्यामध्ये 15 तारखेला पाणी सोडण्याची आमचा आग्रह होता पण 22 तारखेला निर्णय झाला होता आता 24 तारीख गेली तरी देखील पाणी आले नाही. खुप लोकांची मागणी आहे. शेतकरी अडचणीत आहेत. जनावरांना पाणी नाही, बागा जळायला लागल्या आहेत, अशी विनंती आमदार राम शिंदे यांनी केली.

24 मे उजाडले तरी पाणी नाही, कुकडीच्या पाण्यावरून राम शिंदेंनी रोहित पवारांना सुनावले

चंद्रकांत पाटील म्हणाले की आपल्या बैठकीत निर्णय होऊनही जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं. पण त्यांची काळजी केली नाही. त्यांना सांगितले की तुम्ही कालवा समितीच्या बैठकीत बोलायला पाहिजे होतं. आता बैठकीत झालेला निर्णय मला बदलता येत नाही, असे मी त्यांना सांगितले होते पण त्यांनी आंदोलन आणखी तीव्र केलं. त्यामुळे 22 तारखेला झाले नाही पण उद्या 25 तारखेला नक्की होईल. कोणत्याही दबावाला बळी पडू नका अशा अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Tags

follow us