Download App

Mahadev Jankar : राजकारणातली सर्वात मोठी चूक कोणती? जानकरांनी बेधडक सांगूनच टाकलं

Mahadev Jankar criticized BJP : एकेकाळी भारतीय जनता पार्टीचे घनिष्ठ सहकारी म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांचे आता भाजपबरोबर खटके उडू लागले आहेत. जानकर यांनी आता भाजपविरोधाचा अजेंडा सेट करत राज्यातून जनस्वराज्य यात्रा काढली आहे. ही यात्रा काल कर्जत नगरीत दाखल झाली. या यात्रेदरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भाजपवर जोरदार प्रहार केले.

जानकर म्हणाले, देशात भारतीय जनता पक्षाचे धोरण हे काँग्रेसप्रमाणेच झाले आहे. जिसके पास दाम हे उसके साथ हम है’ असे धोरण भाजपचे असून आगामी काळात आमच्यासारखे छोटे छोटे पक्ष भाजपला नक्कीच पराभूत करतील. तसेच देशातील साडचारशे जागांवर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जनस्वराज्य यात्रा देशामध्ये घेऊन जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून आमच्या पक्षाची ताकद काय आहे हे देखील येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांमधून भाजपला दाखवून देऊ.

‘माझं सरकार खेकड्यांनी फोडलं’ : उद्धव ठाकरेंचा तानाजी सावंतांवर घणाघात

भाजपबरोबर गेलो हीच मोठी चूक

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आपण भारतीय जनता पक्षाबरोबर आलो होतो मात्र, मुंडे याच्या जाण्याने मी पोरका झालोय. मात्र आगामी काळात भाजपला त्यांची जागा दाखवून देणार आहे. माझा पक्ष हा आगामी काळात भाजपमध्ये विलीन करण्याचे षडयंत्र रचले जात असले तरी ते आपण होऊ देणार नाही. आगामी निवडणुकीत स्वबळावर सर्व जागा लढवणार असून भाजपाबरोबर जाणे ही सर्वात मोठी चूक होती. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत आमची ताकद दाखवून देऊ, असा इशारा जानकर यांनी दिला.

कर्जतच्या रखडलेल्या एसटी डेपोवर आंदोलनाचा इशारा

कर्जत शहरातील मुख्य स्स्त्यावर पथदिव्यांची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. मी आजच दहा लाख रुपये यासाठी जाहीर करतो. तसेच कर्जतमधील आगाराचा प्रलंबित असलेला प्रश्न देखील सोडवण्यासाठी मी स्वतःच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. हा प्रश्न सुटला नाही तर यावर पक्षाच्या वतीने मोठे आंदोलन येत्या काळात करणार असल्याचे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.

Tags

follow us