अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (Ahmednagar District Central Cooperative Bank)अध्यक्ष उदय शेळके (Uday Shelke)यांच्या निधनानंतर अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेसाठी आज निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात आली होती. या संचालक मंडळात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi)बहुमत असूनही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil)यांनी बाजी पलटवत माजी मंत्री शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile)यांना पुन्हा एकदा अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद मिळवून दिले आहे. शिवाजी कर्डिलेंचा विजय हा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय.
कर्डिले यांनी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा एक मताने पराभव केला. जिल्हा सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विखेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवारांना (Ajit Pawar)धक्का देत आंबादास पिसाळ (Ambadas Pisal) यांचा विजय घडवून आणला होता. तोच पॅटर्न अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही पाहायला मिळाला आहे.
Pune News : पुण्यात स्टंट करत रिल्स बनवणाऱ्या प्रसिद्ध टिकटॉक स्टारच्या धडकेत महिलेचा मृत्यू
बँकेच्या संचालक मंडळात महाविकास आघाडीचं बहुमत आहे. असं असलं तरी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil)काहीतरी चमत्कार घडवू शकतात अशी चर्चा सुरुवातीपासूनच होती. ते खरं ठरवत राधाकृष्ण विखे पाटलांनी चमत्कार घडवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे मंगळवारी (दि.7) अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर होते. त्याचवेळी झालेल्या बैठकीनंतर घुले यांचं नाव निश्चित समजलं जात होतं. महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असल्याची चर्चा होती.
त्यातच शेवटच्या काही क्षणांमध्ये राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली चक्र फिरवत भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड घडवून आणली. हा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय.
आज बँकेत झालेल्या आजच्या विशेष सभेत चंद्रशेखर घुले यांचा सुरुवातीला एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळं त्यांची बिनविरोध निवड होणार असल्याचं मानलं जात होतं. पण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या चतुर खेळीपुढे राष्ट्रवादीचा निभाव लागला नाही अन् जिल्ह्यातील या दोन मातब्बर नेत्यांनी विजय खेचून आणला आहे.