Download App

शिवाजी कर्डिलेंसह मुलगा गोत्यात; धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश

  • Written By: Last Updated:

अहमदनगरः भाजपचे माजी आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) व त्यांचा मुलगा अक्षय हे एका प्रकरणात चांगलेत गोत्यात आले आहेत. बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी माता मंदिराचे प्रमुख व पुजारी अॅड. अभिषेक विजय भगत (Abhishek bhagat) यांना धमकाविल्याप्रकरणी कर्डिलेंसह इतरांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी माता मंदिराचे पुजारी अॅड. अभिषेक भगत यांची बुऱ्हाणनगर, वारूळवाडी येथे वडिलोपार्जित जमिनी आहेत. त्यावरून कर्डिले व भगत कुटुंबात वाद आहेत. त्यावरून शिवाजी कर्डिले यांनी वारूळवाडी भागातील १०० ते १५० गावगुंडानी बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी मंदिरात सुरू असलेल्या नवरात्री उत्सवात धुडगूस घालून भगत कुटुंबियांना घातपात करण्याच्या कट करत चिथावणीखोर भाषणे केल्याचा आरोप भगत यांचा होता. या घटनेची तक्रार अभिषेक भगत २३ सप्टेंबर २०२२ रोजी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. मात्र तेथील पोलिसांनी काहीच कार्यवाही केली नाही.

‘पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा’; मराठा आंदोलनातील लाठीचार्ज प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे आष्टी येथे रेल्वेच्या उद्घाटन समारंभास आले असता अभिषेक भगत यांनी त्यांची भेट घेण्यासाठी सुवेंद्र गांधी यांच्या समवेत त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी एका हॉटेलमध्ये शिवाजी कर्डिले व अभिषेक भगत यांची समोरासमोर भेट झाली. त्यावेळी कर्डिले यांनी भगत यांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केली. त्याचवेळी सुवेंद्र गांधी यांना त्यांच्या मोबाईलवर फोन करत तुला निट करून टाकीन, हातपाय तोडून टाकू अशी धमकी देत मी कायद्याला जुमानत नाही असे बोलून भगतला पाठीशी घालू नको असे सांगितले होते.

Road Accident मध्ये तरूणाचा मृत्यू; खड्ड्यांप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल

सुवेंद्र गांधी व शिवाजी कर्डिले यांच्यात मोबाईलवर झालेले संभाषण सोशल मीडियात त्यावेळी चांगलेच व्हायरल झाले होते. याबाबत गांधी यांनीही कर्डिले यांच्याविरोधात जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दिली आहे. त्यांनतर अभिषेक भगत यांना एका अज्ञात व्यक्तीने भगत यांच्या मोबाईलवर फोन करून शिवाजी कर्डिले व अक्षय कर्डिले यांच्या विरोधात फिर्याद दिली तर जीवे मारण्याची धमकी देत भगत यांच्या आई, पत्नी व बहिनी विषयी लज्जा उत्पन्न होईल अशा अवार्च्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच व्हॉटसअॅपवर शिवीगाळ करत धमकीचे मेसेज करून दहशत निर्माण केली.

याची तक्रार अभिषेक भगत यांनी तातडीने कोतवाली पोलीस स्टेशनला दिली. मात्र पोलिसांनी फिर्याद दाखल न करता केवळ तक्रार दाखल करून घेत आरोपींवर कोणतीही कार्यवाही केली नाही.

त्यामुळे भिंगार कॅम्प व कोतवाली पोलिसांनी आरोपींवर कोणतीही कार्यवाही न केल्याने अभिषेक भगत यांनी जिल्हा न्यायालयात ४ जुलैला २०२३ रोजी अर्ज केला. त्यावर अतिरिक्त मुख्य जिल्हा न्यायाधीश माया देशमुख यांनी ८ सप्टेंबर रोजी निकाल देवून कोतवाली पोलीस स्टेशनला अॅड. अभिषेक भगत यांनी जशी फिर्याद दिली आहे. त्यानुसार माजी आमदार शिवाजी कर्डिले, अक्षय कर्डिले व इतरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Tags

follow us