‘पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा’; मराठा आंदोलनातील लाठीचार्ज प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल
Petition against LathiCharge : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील हे आपल्या मागण्यांवरून मागे हटालया तयार नाहीत. दरम्यान, हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी १ सप्टेंबर रोजी अंतरवली गावात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला होता. त्याविरोधात विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. आता या लाठीचार्च प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठात फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
अॅड. देविदास आर. शेळके यांनी ‘पार्टी इन पर्सन’ ही फौजदारी जनहित याचिका दाखल केली. 1 सप्टेंबर रोजी अंतरवली सराटी इथं सुमारे 1,500 पोलीस आणि SRPF जवानांनी शांततेत आंदोलन करत असलेल्या आंदोलकांना अतिशय निर्दयीपणे लाठीहल्ला करत मारहाण केली. आंदोलन उधळून लावण्यासाठी आंदोलकांवर अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. गोळीबारही करण्यात आला. आंदोलकांच्या अंगावर छर्रे झाडण्यात आले. अनेक आंदोलकांना पोलिसांनी त्यांच्या घरात घुसून मारले. त्यात 100 हून अधिक आंदोलक जखमी, अपंग झाले किंवा त्यांना मुका मारला लागला. या अमानुष मारहाणीत अनेक आंदोलक गंभीर जखमी झाल्याचे या याचिकेत म्हटले आहे.
‘करा किंवा मरा’ सामन्यात बांगलादेशसमोर माफक आव्हान, सदिरा समरविक्रमाची झंझावाती खेळी
जीव वाचवण्यासाठी काहींना पोलिसांवर दगडफेक केली. त्यात १०-१२ पोलिस जखमी झाले. या विरोधात पोलिसांनी 700 हून अधिक आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. मात्र, ज्या अधिकाऱ्यांच्या तोंडी अथवा लेखी आदेशांनी हा हल्ला करण्यात आला. त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई कऱण्यात आली नाही. तरी या मारहाण प्रकरणी जे अधिकारी आणि आणि पोलिस कर्चचारी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहभागी आहेत; त्यांच्यावर गुन्हा दाखल करावे.
या संपूर्ण प्रकरणाची तटस्थ आणि पारदर्शीपणे न्यायालयीन समितीच्या माध्यातून चौकशी करण्यात यावी. तसेच जे आंदोलक जखमी झाले, त्यांच्या मुलभूत आणि मानवी हक्कांचं गंभीर उल्लंघन झालेलं असल्यानं त्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी या फौजदारी जनहित याचिकेत करण्यात आली आहे.
एसपी सक्तीच्या रजेवर
पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जचे पडसाद राज्यभर उमटले होते. लाठीचार्ज केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मराठा समाज अधिकच आक्रमक झाला होता. आक्रमक होत अनेकांनी ठिकठिकाणी बंद पुकारला होता. समाजाचा रोष पाहता जालन्याचे एसपी तुषार दोशी यांनी सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.