Radhakrishna Vikhe : तलाठी भरतीमध्ये 200 पैकी 214 मार्क मिळाले आणि तलाठी भरतीसाठी 30 लाख रुपये घेतल्याचा आरोप एका आमदाराने केला होता यावर उत्तर देताना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आरोप करणाऱ्यांचे हे आरोप प्रसिद्धीसाठी आहेत. असे बेछूट आरोप करून सरकारची बदनामी केली जात असेल तर गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिला.
राज्यातील तलाठी भरतीवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहे. यातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी तलाठी पदाच्या भरती प्रक्रियेच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ नियुक्त करायची मागणी केली, यावर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी महत्त्वाचे भाष्य केले.
राज्यातील तलाठी भरती पारदर्शक झाली असून गुण देण्याची पद्धत ही जुनीच आहे राज्यातील काही भरतीचे निकाल शासनाने जाहीर केले आहेत ही भरती दोन खाजगी कंपन्यांकडून करण्यात आली. त्यामुळे याच्यामध्ये कुठलीही अनियमितता नाही. कुणी मागणी केली म्हणून परीक्षा रद्द होत नसतात या आरोपांमुळे राज्यातील मुलांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि सरकारविषयी नाराजी होते त्यामुळे त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. तसेच तलाठी भरतीवरून केलेले आरोप सिद्ध करा नाहीतर सरकारची बदनामी केली म्हणून कायदेशीर खटल्याला सामोरे जा, असा इशारा विखे पाटील यांनी दिला.
भरती रद्द होणार नाही
तलाठी भरतीवरून विरोधक आक्रमक झाले आहे. वडेट्टीवार यांनी तलाठी पदाच्या भरती प्रक्रियेच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ नियुक्त करायची मागणी केली. यावर विखे यांनी देखील चौकशीसाठी आम्ही तयार आहोत असे म्हटले. तसेच हवे असेल तर वडेट्टीवार यांच्या पक्षाचे सदस्य त्यामध्ये नियुक्त करावेत, आमची काही हरकत नाही. परंतु ही भरती प्रक्रिया रद्द होणार नाही, असेही मंत्री राधाकृष्ण विखे यांनी स्पष्ट केले.
Radhakrishna Vikhe : ‘या’ नेत्यांच्या दुर्लक्षपणामुळे मराठा आरक्षण; मंत्री विखेंचा खळबळजनक आरोप