Download App

Rohit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आनंद मात्र मनात खंत राहील…

  • Written By: Last Updated:

अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर आमदारांचा मोठा गट सोबत घेत सत्तेत सहभागी झाले आहे. सत्तेमध्ये सहभागी झाल्याने अजित दादांसह त्यांच्या नऊ आमदारांना मंत्रिपद देखील मिळाले आहे. यातच दादांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये देखील असल्याच्या चर्चा रंगल्या जात असताना यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री झाले तर त्याचा आनंद होईल मात्र महाराष्ट्राचा नागरिक म्हणून व उलट बाजूच्या विचारांकडे जाऊन त्यांच्या ताकदीने मुख्यमंत्री झाल्याची खंत आपल्या मनात राहील अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. (Rohit Pawar : If Ajit Pawar becomes the Chief Minister, Anand will remain regretful…)

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडाची ठिणगी पेटवली व राज्याच्या राजकारणात मोठा स्फोट झाला. तसेच त्यांच्या या मोठ्या निर्णयामुळे राष्ट्रवादी दोन गटामध्ये विभागली गेली. राष्ट्रवादीत एक अजित पवार यांचा गट निर्माण झाला तर दुसरा गट हा शरद पवार यांचा निर्माण झाला. दरम्यान मतदारसंघाची विकासकामे करायची असेल तर आंपल्याला सत्तेत सहभागी व्हावे लागेल असे आश्वासन आमदारांना अजित दादा यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती काही आमदारांनी दिली. त्यामुळे अनेक आमदारांनी अजित दादांच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

जे विरोधकांची मोट बांधत होते त्यांचीच बोट फुटली; राष्ट्रवादीतील बंडानंतर CM शिंदेंचा पवारांना टोला

दरम्यान शिंदे – फडणवीस सरकारशी हात मिळवणी करत अजित दादांच्या राष्ट्रवादीने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खुद्द अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आपल्या सोबतच्या नऊ आमदारांना देखील मंत्रिपद मिळवून दिले. दरम्यान त्यानंतर शिंदे गट अस्वस्थ झाला. यातच अजित दादा हे मुख्यमंत्री देखील होऊ शकतात अशी चर्चा आता रंगू लागली आहे. यावर अजित दादांचे पुतणे म्हणजेच आमदार रोहित पवार यांनी महत्वाचे भाष्य केले आहे.

कर्जतमध्ये एका कार्यक्रमासाठी आमदार रोहित पवार हे आले होते. यावेळी त्यांनी राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांना अजित पवार मुख्यमंत्री झाले तर याबाबत विचारणा करण्यात आली. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, अजित दादांनी जे विचार गेली अनेक वर्षे जपत आले आहेत, ते विचार घेऊनच ते मुख्यमंत्री झाले असते तर या गोष्टीचा मला पुतण्या म्ह्णून नक्की आनंद झाला असता. मात्र महाराष्ट्राचा नागरिक म्हणून व उलट बाजूच्या विचारांकडे जाऊन त्यांच्या ताकदीने मुख्यमंत्री झाल्याची खंत आपल्या मनात राहील असे वक्तव्य देखील यावेळी रोहित पवार यांनी केले आहे.

Tags

follow us